अहमदनगर : टिळक रोड येथील विघ्नहर्ता संचलित किमया कॉस्मेटिक, गायनॅकॉलॉजी क्लिनिकचा शुभारंभ संपन्न
किमया क्लिनिक महिलांसाठी किमयागार ठरेल – महापौर रोहिणी ताई शेंडगे
नगर -किमया क्लिनिक सेंटरच्या माध्यमातून महिला डॉक्टरांनी एकत्र येऊन महिला रुग्णांच्या खाजगी आरोग्य विषयक समस्यासाठी रुग्णसेवा सुरू केली आहे. विघ्नहर्ता हॉस्पिटल ने नगर शहरामध्ये रुग्णसेवेच्या माध्यमातून ऋणानुबंध निर्माण केले आहे. आता त्यांनी नगर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच महिलांसाठी किमया कॉस्मेटिक गायनॅकॉलॉजी क्लिनिकच्या माध्यमातून सेवा उपलब्ध करून दिली आहे. आता महिलांना पुणे-मुंबई येथे उपचारासाठी जाण्याची आवश्यकता भासणार नाही. आरोग्य सेवेच्या माध्यमातून किमया क्लिनिक महिलांसाठी नक्कीच किमयागार ठरेल असे प्रतिपादन महापौर रोहिणी ताई शेंडगे यांनी केले.
टिळक रोड सक्कर चौक येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल संचलित किमाया कॉस्मेटिक गायनॅकॉलॉजी क्लिनिकचा शुभारंभ महापौर रोहिणी ताई शेंडगे यांच्या हस्ते संपन्न आला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुवर्णाताई जगताप, माजी नगराध्यक्ष अनिता आगरकर, सौ संगीता भोसले, विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. सुप्रिया वीर, डॉ. निलोफर धानोरकर, डॉ. महेश वीर प्रा. सिताराम काकडे, मनोहर वीर डॉ. अखिल धानोरकर, डॉ. अमित कुलांगे, डॉ. प्रियन जुनागडे, डॉ. अजय साबळे, डॉ. शैलेंद्र मरकड, अरविंद डिक्कर आदी उपस्थित होते
सुवर्णाताई जगताप म्हणाले की किमया क्लिनिकमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक मशनरी उपलब्ध असल्यामुळे महिलांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट न होता फक्त एका दिवसामध्ये विनाशकक्रिया व भूल न देता त्यांच्या सर्व सौंदर्य जनक समस्या तसेच त्यांच्या स्त्री रोग समस्या वर उपचार केले जाणार आहे असे ते म्हणाले.
माजी नगराध्यक्ष अनिताताई आगरकर व संगीता भोसले यांनी विघ्नहर्ता हॉस्पिटल संचलित किमया क्लिनिकमध्ये महिलांसाठी अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. सुप्रिया वीर व डॉ. निलोफर धानोरकर यांचे अभिनंदन केले
विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल संचलिका डॉ. सुप्रिया वीर व डॉ. निलोफर धानोरकर म्हणाले कि स्त्रीयांचे सौंदर्य खुलवणारे तसेच स्त्रीयांच्या अनेक समस्यांवर हेअर लॉस ट्रीटमेंट, ओबेसिटी, लायपोसक्शन, स्किन ट्रिटमेंट, कॉस्मेटिक गायनॅकॉलॉजी, लेजर हेअर रिमोव्हल, ब्रेस्ट अॅस्थेटिक्स, ब्रेस्ट कॅन्सर, व्हेरिकोज व्हेन्स ट्रिटमेंट, पेन मॅनेजमेंट, योनीमार्ग कायाकल्प, योनीमार्ग घट्ट करणे, योनीमार्ग कोरडेपणा व जंतुसंसर्ग उपचार, बिनाशस्त्रक्रिया लेजर उपचार अद्ययावत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लेजर मशिन्सद्वारे “किमया” क्लिनीक विघ्नहर्ता हॉस्पीटल येथे उपलब्ध आहे.असे त्या म्हणाले