महाराष्ट्र केसरी व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठीच्या मैदानाचे भूमिपूजन संपन्न.
नगर जिल्ह्याला कुस्ती क्षेत्रात गतवैभव प्राप्त करून देणार – आ.संग्राम जगताप
नगर : नगर जिल्ह्याने कुस्ती क्षेत्राला अनेक नामवंत मल्ल दिले आहे. त्यांच्यामुळेच नगर जिल्ह्याचा कुस्ती क्षेत्रात दबदबा राहिला आहे, मात्र कालांतराने कुस्ती क्षेत्राकडे दुर्लक्ष झाले, मल्लांना कुस्तीबाबत योग्य मार्गदर्शन मिळाले नाही,तसेच कुस्ती खेळण्यासाठीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही. त्यामुळे दिवसेंदिवस मल्लांची संख्या कमी होत आहे. पुन्हा नगर जिल्ह्याला कुस्ती क्षेत्रात गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी, जास्तीत जास्त मल्ल तयार करण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यांना कुस्तीसाठी योग्य सुविधा आणि मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी कुस्ती स्पर्धांचेही आयोजन केले जाणार आहे. महाराष्ट्र केसरी व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठीच्या निवड चाचणी स्पर्धेचे आज आयोजन करण्यात आले, असून त्याचे भूमिपूजन काल संपन्न झाले. स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू घडला जात असतो. लाल मातीतील कुस्ती ही युवकांना मार्गदर्शन व प्रेरणा देणारी असते, त्या माध्यमातून नेतृत्व तयार होत असते. लाल मातीच्या माध्यमातून चांगले विचार आत्मसात होते, पुढील काळात लवकरच नगर शहरांमध्ये राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. महाराष्ट्र केसरी व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी ही निवड चाचणी होत असून मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी होणार असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
नगर शहरातील टी.व्ही सेंटर जवळील गंगा उद्यान मागील खेळाच्या मैदानावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघ आयोजित अहमदनगर जिल्हा कुस्ती निवड चाचणी माती व गादी विभागात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठीच्या मैदानाचे भूमिपूजन माजी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र कवडे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष आ.संग्राम जगताप, उपमहापौर गणेश भोसले, संघाचे सचिव डॉ. पै.संतोष भुजबळ, मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, प्राध्यापक माणिकराव विधाते, निखिल वारे, प्राध्यापक अरविंद शिंदे, पैलवान शिवाजी चव्हाण, अभिजीत खोसे, डॉक्टर सागर बोरुडे,सुरेश बनसोडे, युवराज करंजुले, सतीश बारस्कर, बाळासाहेब बारस्कर, संभाजी पवार, सुनील त्रिंबके, संतोष ढाकणे, वैभव ढाकणे, वैभव वाघ, सुरज शिंदे, संतोष लांडे, अजिंक्य बोरकर, सागर गुंजाळ, सागर मुर्तडकर, (भा) कुरेशी, राजू तागड, राहुल गाढवे, अतुल कावळे, दादा पांडुळे, मोहन गुंजाळ, नितीन आव्हाड, मळु गाडळकर, दीपक खेडकर, प्रताप गायकवाड, अमित गाडे, विष्णू खोसे, किरण पिसोरे, किरण कातोरे, विशाल पवार, गौरव कराळे, अरिफ शेख, गजेंद्र भांडवलकर, सुमित कुलकर्णी, सचिन जगताप व पैलवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संतोष भुजबळ म्हणाले की, पुणे फुलगाव येथे दिनांक 4 ते 9 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र केसरी व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन केले आहे. मागील 40 वर्षांमध्ये जिल्हास्तरीय निवड चाचणीची स्पर्धा अशा पद्धतीने झाली नाही. यावर्षी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली या नियोजनबद्ध स्पर्धेचे आयोजन केले आहे, या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस उपस्थित राहणार आहे, ते तीनदा विदर्भ केसरी म्हणून विजय झालेले आहे. या स्पर्धेची अंतिम तयारी पूर्ण झाली आहे. जिल्हाभरातील कुस्तीपटू मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे, या कुस्ती स्पेर्धेमध्ये खेळाडूंना प्रत्येक वजन गटामध्ये दोन किलो वजनाची सूट राहील, असे ते म्हणाले