Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»अहमदनगर ब्रेकिंग : भागानगरे खून प्रकरणातील आरोपींना कारागृहात भेटण्यासाठी बनावट आधार कार्डचा वापर
    Ahmednagar

    अहमदनगर ब्रेकिंग : भागानगरे खून प्रकरणातील आरोपींना कारागृहात भेटण्यासाठी बनावट आधार कार्डचा वापर

    newstoday24By newstoday24October 27, 2023No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अहमदनगर ब्रेकिंग : भागानगरे खून प्रकरणातील आरोपींना कारागृहात भेटण्यासाठी बनावट आधार कार्डचा वापर

    कामगार जातो भाऊ म्हणून आरोपीला भेटण्यासाठी; तुरुंग अधिकारीचे दुर्लक्ष असल्याचा मयताच्या वडिलांचा आरोप

    बनावट आधार कार्ड वापरणाऱ्या व या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या तुरुंग अधिकारीवर कारवाईची मागणी

    अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील ओमकार उर्फ गामा भागानगरे खून प्रकरणातील आरोपींना भेटण्यासाठी कारागृहात बनावट आधार कार्ड वापरणाऱ्या व या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अहमदनगर जिल्हा (सबजेल) कारागृहाच्या तुरुंग अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मयताचे वडिल पांडुरंग भागानगरे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
    आरोपी गणेश हुच्चे यांच्या अवैधधंद्यांवर कामावर असलेला अमोल येवले याने अमोल केरप्पा हुच्चे या बनावट नावाचा आधारकार्ड घेऊन कारागृहात आरोपींना भेट असल्याचा आरोप पांडुरंग भागानगरे यांनी केला आहे. तर दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, ओमकार उर्फ गामा भागानगरे याचे 20 जून रोजी बालिकाश्रम रोड येथे निर्घुण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी गणेश हुच्चे, नंदू बोराटे व संदीप गुडा हे न्यायालयीन कोठडीत सबजेल कारागृहात आहेत. कैद्यांच्या घरच्या लोकांना भेटण्यासाठी बुधवार हा दिवस निश्‍चित केलेला आहे. गणेश हुच्चे याचे शहरात अवैधधंदे असून, अमोल येवले हा त्या ठिकाणी कामगार आहे. अमोल येवले याने अमोल केरप्पा हुच्चे या नावाने बोगस आधार कार्ड बनवले असून, या आधारकार्डद्वारे तो नियमितपणे आरोपी गणेश हुच्चे याची भाऊ म्हणून भेट घेत आहे. अमोल येवले हा नेमका कोणत्या नावाने आरोपीची भेट घेतो? हे पाहण्यासाठी 6 ऑक्टोबर रोजी सबजेल येथे गेलो असता, या प्रकरणासंबंधी तुरुंग अधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी रजिस्टरची तपासणी केली. त्यावेळी येणारा व्यक्ती बनावट आधारकार्डद्वारे आरोपीची भेट घेत असल्याचा उलगडा झाला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
    याबाबत तुरुंग अधिकारी यांच्याकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असता, त्यांनी दमबाजी करुन आंम्ही कोणाला भेटू द्यायचे, कोणाला नाही? आंम्ही ठरवणार. या भानगडीत पडू नका, अन्यथा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी तुरुंग अधिकारी यांनी दिल्याचा आरोप भागानगरे यांनी केला आहे. बोगस आधार कार्डचा वापर करून येवले हा आरोपी हुच्चे याला भेटत असून, त्याला तुरुंग अधिकारी मदत करत असल्याचेही निवेदनात म्हंटले आहे.

    #kotwalipolice #nagarpolice #newstoday24ahmednagar #omkarbhaganagre
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleनगर जिल्ह्याला कुस्ती क्षेत्रात गतवैभव प्राप्त करून देणार – आ.संग्राम जगताप
    Next Article बळी महोत्सव सम्राट एकलव्य जयंती उत्सव अध्यक्षपदी तांबटकर, खजिनदारपदी डॉ. शिंदे तर पाहुण्या म्हणून महिला कामगार नेत्या किरणताई मोघे
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.