Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»बळी महोत्सव सम्राट एकलव्य जयंती उत्सव अध्यक्षपदी तांबटकर, खजिनदारपदी डॉ. शिंदे तर पाहुण्या म्हणून महिला कामगार नेत्या किरणताई मोघे
    Ahmednagar

    बळी महोत्सव सम्राट एकलव्य जयंती उत्सव अध्यक्षपदी तांबटकर, खजिनदारपदी डॉ. शिंदे तर पाहुण्या म्हणून महिला कामगार नेत्या किरणताई मोघे

    newstoday24By newstoday24November 6, 2023No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बळी महोत्सव सम्राट एकलव्य जयंती उत्सव अध्यक्षपदी तांबटकर, खजिनदारपदी डॉ. शिंदे तर पाहुण्या म्हणून महिला कामगार नेत्या किरणताई मोघे; १४ नोव्हेंबरला मिरवणूक

    अहमदनगर (प्रतिनिधी) ५.११.२०२३
    शहरात २००९ पासून म्हणजेच गेल्या चौदा वर्षापासून बळी महोत्सव व सम्राट एकलव्य जयंती उत्सव साजरा केला जातो. यावर्षीच्या बळी महोत्सव एकलव्य जयंती समितीच्या अध्यक्षपदी अहमदनगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा रहेमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर यांची तर खजिनदारपदी ग्रामविकासाचे ख्यातनाम अभ्यासक डॉ. प्रशांत शिंदे यांची एकमतांनी निवड करण्यात आली. यावेळी उर्जिता फौंडेशनच्या संध्या मेढे, कामगार नेते कॉ. भैरवनाथ वाकळे, मराठा सेवा संघ महानगराध्यक्ष इंजि. अभिजीत एकनाथ वाघ, सिटूचे जिल्हाध्यक्ष कॉ. प्रा. डॉ. महेबूब सय्यद, इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष आसिफखान दुलेखान, दत्ताभाऊ वडवणीकर, संतोष गायकवाड, विजय केदारे आदी उपस्थित होते.
    येत्या १४ नोव्हेंबरला होणाऱ्या बलिप्रतिपदेला सालाबाद प्रमाणे हुतात्मा चौथे शिवाजी महाराज स्मारक ते माळीवाडा येथील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकापर्यंत पारंपरिक वाद्यांच्या जयघोषात मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच यावेळी पारंपारिक शस्त्रांचे प्रदर्शन आणि प्रात्यक्षिक देखील दाखविले जाणार आहे. या उत्सवाच्या निमित्ताने सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येवून शेतकरी राजा बळीराजा व आदिवासी सम्राट एकलव्य यांचे स्मरण व गौरव करण्यात येतो. त्यानिमित्ताने बहुजन समाजातील शेतकरी, कामगार व सर्वसामान्य माणसांच्या विविध प्रश्नांची चर्चा करून त्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जातो.
    याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून पुणे येथील स्त्रीविचारवंत, जनवादी महिला संघटनेच्या आणि घर कामगारांच्या नेत्या किरणताई मोघे या मार्गदर्शन करणार आहेत. तरी या महोत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, ही विनंती बळी महोत्सव व सम्राट एकलव्य जयंती उत्सव समितीने केली आहे.
    ००००
    फोटोओळ – बळी महोत्सव व सम्राट एकलव्य जयंती उत्सवाच्या प्रमुख पाहुण्या किरणताई मोघे, अध्यक्ष – युनूस तांबटकर, खजिनदार डॉ. प्रशांत शिंदे.

    #ahmednagar #newsupdate #newstoday24ahmednagar
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleअहमदनगर ब्रेकिंग : भागानगरे खून प्रकरणातील आरोपींना कारागृहात भेटण्यासाठी बनावट आधार कार्डचा वापर
    Next Article नगर अर्बन बँक विरोधात ठेवीदारांचा आसूड मोर्चा ; मा. खा. स्व. दिलीप गांधी यांच्या घरासमोर निदर्शने
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहिल्यानगर महानगरपालिकेची शहरात महिनाभर अतिक्रमण हटाव मोहीम शहराच्या सर्व भागातील अतिक्रमणे हटवणार

    February 12, 2025
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.