भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने दिव्यांगाच्या राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन
जास्तीत जास्त दिव्यांग बंधू व भगिनींनी राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळाव्यास उपस्थित राहावे – महिला जिल्हा अध्यक्षा आशा गायकवाड़
नगर : जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून भा.ज.पा. दिव्यांग विकास आघाड़ी अहमदनगर, यांच्या वतीने बुधवार दिनांक १३/१२/२०२३ रोजी, सकाळी १० ते ५ यावेळेत राज्यस्तरीय दिव्यांग बंधू व भगिनींसाठी वधूवर मेळाव्याचे आयोजन, लक्ष्मी-नारायण मंगल कार्यालय, टिळक रोड, अहमदनगर. येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते होणार असून माजी राज्यमंत्री तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत तसेच आमदार संग्राम जगताप, भाजपा युवा मोर्चा दक्षिण जिल्हा अध्यक्ष अक्षय कर्डिले, भरतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, महापौर रोहिणी शेंडगे, समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देव्हढे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांची प्रमुख उपस्थिती रहाणार आहे. तरी जास्तीत जास्त दिव्यांग बंधू व भगिनी यांनी या दिव्यांगाच्या राज्यस्तरीय वधू वर परीचय मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन महिला जिल्हा अध्यक्षा आशाताई गायकवाड़ यांनी केले
नगर शहरात भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांगाच्या राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळाव्यासाठी भाजपा दिव्यांग विकास आघाडी जिल्हाअध्यक्ष वसंत शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष विजय पडोळे, जिल्हा सचिव संतोष शेंडगे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत काळे, जिल्हा उपाध्यक्ष, ईश्वर गुंड, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल कराळे, जिल्हा सरचिटणीस सुरेश देवकर, जिल्हा सहसचिव कैलास शेलार, महिला जिल्हा सरचिटणीस दिपाली पडोळे, महिला जिल्हा उपाध्यक्ष जामगावकर, नगर तालुका अध्यक्ष श्रीकांत काळे, नगर तालुका उपाध्यक्ष संदीप शेंडकर, शेवगाव तालुकाध्यक्ष प्रशांत ढाकणे, नेवासा तालुका अध्यक्ष सोनाजी शेळके, तसेच प्रहार क्रांती आंदोलनाचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण पोकळे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे अपंग जिल्हा अध्यक्ष रत्नाकर ठाणगे, सावली दिव्यांग संघटना अध्यक्ष बाबासाहेब महापुरे, आधार संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण खडके आदींचे मोठे सहकार्य लाभणार आहे.