अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने व आंजनेय प्रतिष्ठान आयोजित बाळासाहेब पवार स्मृती करंडक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न
लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणे ही काळाची गरज – आमदार संग्राम जगताप
नगर ; शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्राचे धडे देणे गरजेचे आहे यासाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन होणे गरजेचे आहे या माध्यमातून खेळाडू घडला जात असतो, आंजनेय प्रतिष्ठानच्या माध्यमातून 14 व 19 वर्षीय खेळाडूंसाठी बाळासाहेब पवार स्मृती करंडक स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेट खेळाडूंसाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण झाले आहे, दर्जेदार खेळाडू घडविण्यासाठी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन होणे गरजेचे आहे खेळाडूंच्या भविष्यासाठी प्रत्येकाने काम करावे सारसनगर यथे स्पोर्ट कॉम्प्लेक्स ची निर्मिती होत असून या ठिकाणी विविध क्रीडा प्रकाराची मैदाने निर्माण होत आहे त्याचबरोबर खेळाडूंना सर्व सुविधा व प्रशिक्षण निर्माण करून दिले जाणार आहे कै, बाळासाहेब पवार यांचा क्रिकेटचा वारसा कपिल पवार पुढे घेऊन जात असून त्यांचे क्रिकेट खेळाडू घडविण्याचे स्वप्न पूर्ण करत आहे या स्पर्धेचा शुभारंभ मुलींच्या क्रिकेट सामान्यांनी करणे ही बाब कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले
अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने व आंजनेय प्रतिष्ठान आयोजित बाळासाहेब पवार स्मृती करंडक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले,. यावेळी प्रा. माणिकराव विधाते, सुमतीलाल कोठारी, गणेश गोंडाळ,गौरव पितळे, ज्ञानेश चव्हाण, क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कंपनीचे जनरल मॅनेजर गौतम सुवर्णपाठकी, प्रदीप आरोटे, कपिल पवार, निखिल पवार, सोमनाथ नजान, भरत पवार, डॉ. राहुल पवार, संदीप पवार, दिलीप पवार, भास्कर गायकवाड, श्रीकांत निंबाळकर, विजय धोत्रे, विजय गव्हाळे, सागर बनसोडे, अरुण नाणेकर, परवेज सय्यद, जगन्नाथ ठोकळ, सुनील देवकर, गौतम शिंगी, हेमंत मुळे,नंदेश शिंदे, परमेश्वर पाटील, अभय शेंडगे, आदींसह खेळाडू उपस्थित होते,
कपिल पवार म्हणाले की, क्रिकेट खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा, खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे खेळाडूंच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी आंजनेय प्रतिष्ठानच्या माध्यमातून वडिलांच्या स्मरणार्थ गेल्या ७ वर्षांपासून लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जात असून पुढील वर्षी पासून जर मुलींचे चार संघ तयार झाले तर त्यांच्या देखील स्पर्धा आयोजित केल्या जातील सर्वांच्या सहकार्यातून या स्पर्धेचे आयोजन केले असून यात २७ संघ सहभागी झाले आहे. या स्पर्धेतून अनेक खेळाडू तयार झाले असून पुढील मोठ्या स्पर्धेसाठी खेळत आहे हे कौतुकास्पद असून आ, संग्राम जगताप यांच्या माध्यमातून क्रिकेट खेळासाठी प्रोत्साहन मिळत असते,
चौकट : कन्या परमेश्वरी हिच्या लेदर बॉलवरील बॉलिंग पाहून आ, संग्राम जगताप भारावले
वाकोडी रोडवरील क्रिकेटच्या मैदानावर अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने व आंजनेय प्रतिष्ठान आयोजित बाळासाहेब पवार स्मृती करंडक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटना प्रसंगी आ, संग्राम जगताप हे मुलगी परमेश्वरी हिची लेदर बॉल वरील बॉलिंग पाहून भारावले, त्यांनी देखील मुलीच्या बॉलिंगवर क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला, क्रिकेट प्रेमींनी परमेश्वरी जगताप हिच्या लेदर बॉलवरील बॉलिंगचे कौतुक केले