निर्मळ पिंप्री येथील पूर्व नियोजित कट करून कोळगे कुटुंबीयांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींवर गंभीर स्वरूपाचे दुनियाची कलमे लावून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना आर.पी.आय आठवले गटाच्या वतीने देण्यात आले
येत्या आठ दिवसात या आरोपींवर कडक कारवाई करा अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल
अहमदनगर प्रतिनिधी: निर्मळ पिंपरी (ता. राहाता) येथील गंभीर स्वरूपाच्या घडलेल्या घटनेत पोलीस प्रशासनाकडून पिडीतेची फिर्याद घेताना गंभीर स्वरूपाच्या कलमांची नोंद घेतली गेलेली नसून सदर कुटूंबाला भविष्यात न्याय मिळणेसाठी व कायदा सक्षम असल्याची जनतेचा जाणीव व्हावी यासाठी फिर्याद दाखल होताना ठाणे अंमलदार यांनी जी कलमे फिर्यादीमध्ये नमूद करणे आवश्यक होते ती कलमे लावली गेलेली नाही. गरीब व दलित कुटुंबाच्या अज्ञानाचा व परिस्थितीचा गैरफायदा घेवून या पिडीत कुटूंबाच्या फिर्यादी यांच्या आपबितीनुसार पूर्व नियोजित कट रचणे, घरात बळजबरीने प्रवेश करणे, अल्पवयीन मुलीचा गळा आवळून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, तिच्याशी अश्लिल कृत्य करणे, तिला अपमानीत करणे, घर गाडी व जनावरांसह गोठा जाळण्याचा प्रयत्न करणे, घरामध्ये झुंडीने घुसून घरातील सामानांची मोडतोड करून मौल्यवान वस्तू लुटणे आदी घटना घडलेल्या आहेत. या घटनेतील आरोपींवर पोलीसांकडून पॉक्सोसारख्या कलमांची नोंद फिर्यादीमध्ये न घेणे, सदरील कुटूंबावर बहिष्कार टाकणे, गाव बंद करून दहशत निर्माण करणे हा सर्व प्रकार गंभीर गुन्ह्याचा असून केवळ अनुसूचित घटकातील कुटूंब असल्याने कोणाच्यातरी दबावामुळे या गंभीर गुन्ह्याची नोंद फिर्यादीमध्ये केलेली नाही.सदर घटना घडल्यानंतर कोणकोणत्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना फिर्याद दाखल होताना दबावाकरिता फोन आले? कायद्याचा दुरूपयोग करणाऱ्या ठाणे अंमलदारासह पोलीस संबंधीत पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. फिर्यादीच्या अज्ञानाचा तसेच दबावतंत्राचा वापर करून त्यांना गंभीर स्वरूपाच्या कलमांच्या नोंदीपासून वंचित ठेवून जातियता तीव्र करण्याची जाणिव करून दिली गेली आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. सर्वोच्च न्यायालय तसेच राज्य सरकार यांनी देखिल अशा प्रकारांना आळा बसण्यासाठी निर्णय दिलेले आहेत. आपण या विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहात. या घटनेमध्ये पोलीस खात्यातील जे कोणी जबाबदार असतील त्यांचेवर तात्काळ कारवाई करून त्यांना निलंबीत करावे तसेच सदर फिर्यादी महिलेच्या फिर्यादीमध्ये तत्काळ पुरवणी जबाब नोंदवून या गंभीर गुन्ह्याची नोंद करून पिडीतेला न्याय मिळवून द्यावा. अन्यथा रिपाईच्या वतीने या प्रकरणाला पोलीस प्रशानासह, मानवी हक्क आयोग, गृहविभाग तसेच न्यायालयात दाद मागितली जाईल.वाढीव कलम नोंद होणेसाठी उचित आदेश संबंधितांना द्यावे तसेच आरोपींवर येत्या आठ दिवसात कडक कारवाई करावी अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल व या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी ही पोलीस प्रशासनवर राहील, असे निवेदनात म्हटले आहे यावेळी यावेळी विलास साळवे,शिरीष गायकवाड, सुनील चांदणे, आप्पासाहेब मकासारे, सागर साळवे, विवेक सांगळगीळे, राजू दाभाडे, सुनील साळवे, तुषार दिवे, कुमार भिंगारे आदी उपस्थित होते