एमआयडीसी मध्ये आढळला मृतदेह खून झाल्याचा संशय
घटनास्थळी लीसपो अधीक्षक दाखल
अहमदनगर प्रतिनिधी:एमआयडीसी येथे एका ३५ वर्षीय कामगाराचा मृतदेह आढळला आहे.मृतदेह मोकळ्या जागेत फेकल्याने खून झाल्याचे दाट संशय व्यक्त होत आहे.अज्ञात व्यक्तीने एमआयडीसी येथील प्लॉट नं एफ ७१ च्या पाठीमागील मोकळया जागेत हा मृतदेह फेकून दिला.या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, एमआयडीसीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्रे फिरविली.ओमप्रकाश रामबचन महातो असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.ओमप्रकाश याला दारूचे व्यसन होते.त्यांची पत्नी दर्गादेवी महातो यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दारूच्या कारणावरून त्याचा अज्ञात सहकाऱ्यांबरोबर वाद होऊन हत्याराने मारुन ही घटना घडली असावी व त्यानंतर मृतदेह फेकून दिला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे