असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार याला दोन वर्षांसाठी पाच जिल्ह्यातून प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी तडीपार केले आहे. असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार याच्यावर पुणे येथील जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या बॉम्बस्फोटामधील आरोपींना शस्त्र पुरविल्याच्या आरोप होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्हा प्रशासनाने कुख्यात गुंडांविरोधात कारवाईचा सत्र सुरु केला असून , ही करण्यात आली.
बंटी जहागीरदार याला अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, बीड या जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून बंटी जहागीरदाराविरोधात तडीपारीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे दाखल करण्यात आला होता. प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी या प्रस्तावावर सुनावणी घेतली. यात भिवंडी, मनमाड, नेवासा, श्रीरामपूर शहर, डेक्कन (पुणे) आणि मुंबईतील दहशतवाद विरोधी पथकाकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. याची दखल घेऊन अहमदनगर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपारीचा आदेश प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी काढला.