तुतारी चिन्हाचं अनावरण होत असतानाच भाजप नेत्याची जोरदार टीका; म्हणाले, तुताऱ्या वाजवा नाहीतर…
तुतारी चिन्हाच्या अनावरणाच्या दिवशी भाजप नेत्याची राष्ट्रवादी शरद पवार गटावर जोरदार टीका… मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आणि मराठा आरक्षणावर भाजप नेत्याची तुतारी चिन्हाचं अनावरण होत असतानाच भाजप नेत्याची जोरदार टीका; म्हणाले, तुताऱ्या वाजवा नाहीतर…
24 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नव्या चिन्हाचं आज अनावरण होत आहे. किल्ले रायगडावर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मात्र जोरदार टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही टीका केली आहे. तुम्ही तुताऱ्या वाजवा… नाहीतर मशाली पेटवा. पण आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आम्ही 45 पेक्षा जास्त जागा आम्ही निवडणूक आणू, असं म्हणत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार गट आणि ठाकरे गटावर टीका केली आहे.
शेतकरी आंदोलनावर काय म्हणाले?
दिल्ली शेतकरी आंदोलनावरही चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी समर्थ आहेत. नरेंद्र मोदी हे आपल्या मंत्र्यांच्या मदतीने संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. यातून नक्कीच मार्ग निघेल. कुणी धमकी देण्याचं कारण नाही. मोदींच्या नेतृत्वाखाली जगात भारत स्ट्रॉंग झाला आहे. त्यामुळे अशा धमक्यांना घाबरायचं कारण नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.