नाशिकमध्ये चाललंय काय ? आर्थिक वादातून डॉक्टरवर कोयत्याने हल्ला, प्रकृती चिंताजनक
डॉक्टरांना देवाचं रुप मानलं जातं. रुग्णांची सेवा करण्याचे, त्यांचा जीव वाचवण्याचे कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टरांना देवस्वरूप मानलं जातं. मात्र याच डॉक्टरांच्या जीवावार बेतलं तर ? अशीच एक खळबळजनक बातमी नाशिकमधून समोर आली आहे. आर्थिक वादातून एका इसमाने डॉक्टरवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

नाशिकमधील सुयश हॉस्पिटलचे डॉक्टर सुयश राठी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. रुग्णालय जनसंपर्क अधिकारी महिलेचा पती हाच संशयित आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. पैशाच्या वादातून हा हल्ला करण्यात आला असून आरोपीने डॉक्टर राठींवर कोयत्याने तब्बल 16 वाक केले. या हल्ल्यात डॉ. राठी गंभीररित्या जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
हल्ल्याची माहिती मिळताच पंचवटी पोलिस स्टेशनमधील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुढील तपास सुरू केला. दरम्यान या हल्ल्याच्या निषेधार्थ आज नाशिक शहरातील रुग्णालय बंदची हाक देण्यात आली आहे.