Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»अन्नधान्य वितरण अधिकारी तहसीलदार सपना भोईटे यांना नागरिकांनी दिले निकृष्ट तांदूळ भेट
    Ahmednagar

    अन्नधान्य वितरण अधिकारी तहसीलदार सपना भोईटे यांना नागरिकांनी दिले निकृष्ट तांदूळ भेट

    newstoday24By newstoday24February 24, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    स्वस्त धान्य दुकानदारांकडून पांढऱ्या तांदळाचा काळा बाजार – अजय चितळे

    अन्नधान्य वितरण अधिकारी तहसीलदार सपना भोईटे यांना नागरिकांनी दिले निकृष्ट तांदूळ भेट

    नगर : शहरातील स्वस्त धान्य दुकानदारांकडून पांढऱ्या तांदळाचा काळा बाजार सुरु असून देशमुख गल्ली व दिल्लीगेट परिसरातील स्वस्त धान्य दुकान क्र २ आणि ३० दुकानातनिकृष्ट दर्जाचे तांदूळ स्वस्त धान्य दुकानदारांकडून लाभार्थ्यांना वितरित करण्यात येत असून त्या मध्ये प्लास्टिक तांदूळ तुकडे मिक्स करून नागरिकांना दिले जाते व त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचे काम स्वस्त धान्य दुकानदार करत आहे, याबाबत लाभार्थी महिलांनी माझ्याकडे येत तक्रार केली, लाभार्थ्यांकडून हाताचे ठसे घेतले जातात मात्र तीन तीन चार चार महिने स्वस्त धान्य वितरित केलेच जात नाही यामुळे लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ येत आहे, चांगला तांदूळ न देता खराब, कचरा प्लास्टिक मिश्रित तांदूळ नागरिकांना वितरित करण्यात आहे हा निकृष्ट तांदूळ अन्नधान्य वितरण अधिकारी तहसीलदार सपना भोईटे यांना नागरिकांनी कार्यालयात जाऊन भेट दिला तरी स्वस्त धान्य दुकानदारांवर तातडीने कारवाई करत स्वस्त धान्य दुकानदारांकडून काळा बाजार थांबवावा अशी मागणी भाजपचे पदाधिकारी अजय चितळे यांनी केली.
    अन्नधान्य वितरण अधिकारी तहसीलदार सपना भोईटे यांना नागरिकांनी निकृष्ट तांदूळ भेट दिले यावेळी अजय चितळे, सुनील शिंदे, श्रीपाद वाघमारे, अमित पाखले, गणेश आटोळे आदींसह महिला नागरिक उपस्थित होते,

    सरकार कडून स्वस्त धान्य दुकानदारांना लाभार्थ्यांना वाटण्यासाठी चांगल्या दर्जाचे धान्य येत असते, मात्र संबंधित दुकानदारांकडून या धान्यात भेसळ करत चांगल्या तांदळात प्लास्टिक तांदूळ मिक्स करण्याचा प्रकार स्वस्त धान्य दुकानदार करत मनमानी कारभार करत लाभार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहे, स्वस्त धान्य दुकानदारांच्या या कृत्यामुळे सरकारविषयी नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे असे मत भाजपचे पदाधिकारी अजय चितळे यांनी व्यक्त केली.

    #ahmednagar #newsupdate
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleसहाय्यक कामगार आयुक्त व जिल्हा प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर एमआयडीसी येथील ईटन कंपनीतील कामगारांचे उपोषण मागे
    Next Article एसटीचा सहा महिने करता येणार मोफत प्रवास, कोण ठरणार पात्र
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहिल्यानगर महानगरपालिकेची शहरात महिनाभर अतिक्रमण हटाव मोहीम शहराच्या सर्व भागातील अतिक्रमणे हटवणार

    February 12, 2025
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.