सहाय्यक कामगार आयुक्त व जिल्हा प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर एमआयडीसी येथील ईटन कंपनीतील कामगारांचे उपोषण मागे
कामगार कायद्याचे पालन करून कामगारांना हक्क मिळवून द्यावा – अध्यक्ष संतोष लांडे
नगर :एमआयडीसी येथील ईटन कंपनीतील कामगारांचे गेल्या १७ महिने प्रलंबित असलेला वेतन वाढ करार करणे कंपनी चालूं झाल्यापासून माथाडी कायद्याचे सर्वेक्षण करून कायद्याची अंमलबजावणी करावी, रात्रपाळीला महिला कामगारांना कामासाठी बोलावून घेतले जात असून त्यांना बोलवून घेऊ नये, कमी केलेल्या महिलांना कामावर पुन्हा घेण्यात यावे, कंपनीत महाराष्ट्रातील सण उत्सव, परंपरा. महापुरुषांच्या जयंती,पुण्यतिथी साजरी करण्यास परवानगी द्यावी अशा विविध मागण्यांसाठी,प्रलंबित प्रश्नांसाठी अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण सुरु केले होते, सहाय्यक कामगार आयुक्त व जिल्हा प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले असून २६ फेब्रुवारी रोजी या प्रश्नांसंदर्भात बैठकीचे आयोजन केले आहे, कामगारांच्या हितासाठी अहमदनगर जिल्हा कामगार संघटना काम करत असून कामगार व प्रशासन यातील दुवा आहे, तरी कंपनी प्रशासनाने कामगार कायद्याचे पालन करून कामगारांना हक्क मिळवून द्यावा यासाठी कामगार आयुक्त कार्यालयाने प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे लेखी आश्वासन दिले आहे, कंपनीचे हित जोपासण्याचे काम कामगार करत असून उत्पादन व गुणवत्ता याकडे ईटन कंपनीचे कामगार लक्ष देत असून कंपनीच्या उन्नतीसाठी काम करत आहे, तरी कंपनीने देखील आढेवेढे न घेता कंपनीने कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे यांनी केली
सहाय्यक कामगार आयुक्त व जिल्हा प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर एमआयडीसी येथील ईटन कंपनीतील कामगारांचे उपोषण मागे घेण्यात आले यावेळी अध्यक्ष संतोष लांडे पदाधिकारी किरण दाभाडे, कामगार प्रतिनिधी महेश चेडे, कासिम शेख, किरण जपे, पमोल पवार, अशोक सांगळे, प्रशांत दराडे, गौतम मेटे यांच्यासह अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेचे सभासद, कामगार बंधू-भगिनी,पदाधिकारी तसेच यावेळी कंपनी प्रशासक पेवाल, सहाय्यक कामगार आयुक्त कवले आदी उपस्थित होते,