Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Breaking»
    Breaking

    newstoday24By newstoday24February 26, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कल्याण रेल्वे स्थानकावर स्फोटकं ठेवणाऱ्या दोघांना बेड्या, मोठा घातपाताचा होता कट?

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे एक सराईत गुन्हेगार आहेत. या दोघांनी कल्याण स्काय वॉकवर रात्री झोपलेल्या दाम्पत्याची बॅग चोरली. त्यानंतर ते ती बॅग घेऊन प्लॅटफॉर्म नंबर एकवर आले.

    कल्याण रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक 1 वर 21 फेब्रुवारीला स्फोटकांच्या 54 इलेक्ट्रीक डेटोनेटरच्या काड्या मिळाल्याने खळबळ उडाली होती. या वेळेस कल्याण लोहमार्ग पोलिसांनी बॉम्ब स्कॉटच्या मदतीने हे स्फोटक इलेक्ट्रीक डेटोनेटरच्या काड्या ताब्यात घेतल्या होत्या. पोलिसांनी त्यानंतर अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू होता. कल्याण लोहमार्ग पोलिसांना सीसीटीव्हीच्या मदतीने स्फोटक पदार्थांची बॅग स्टेशनवरती टाकणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. जॉय डेव्हिड कालवा उर्फ नायडू, ऋषीकेश देविदास निकुंभ असे या आरोपींची नावे आहेत. कल्याण लोहमार्ग पोलिसांना या प्रकरणात मोठं यश आलंय. पण अद्यापही तपास पूर्ण झालेला नाही, अशी माहिती समोर येत आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे एक सराईत गुन्हेगार आहेत. या दोघांनी कल्याण स्काय वॉकवर रात्री झोपलेल्या दाम्पत्याची बॅग चोरली. त्यानंतर ते ती बॅग घेऊन प्लॅटफॉर्म नंबर एकवर आले. त्यांनी अंधारात त्या बॅगेत काही मौल्यवान वस्तू मिळतात का? याची तपासणी केली. त्यांनी बॅगेतले गरजेचे सामान काढून घेतले. त्यानंतर त्यांनी स्फोटक पदार्थ बॅगेत टाकले. स्फोटकांनी भरलेली बॅग ठेवून त्यांनी तिथून पळ काढला.

    पोलिसांनी दोन्ही आरोपींना आता ताब्यात घेतलं आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी आरोपींना कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले असता रेल्वे न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, ती बॅग आणणारे ते दोघे कोण होते? याचा तपास कल्याण लोहमार्ग पोलीस करत आहेत. आरोपींना कल्याण रेल्वे स्थानकावर मोठा घातपात घडवण्याचा कट होता की त्यांना दुसरीकडे घातपात घडवायचा होता? त्यांनी ती स्फोटकं का बाळगली? कल्याण रेल्वे स्थानकावर का ठेवली? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

    #Breaking #Update #Crime #Police
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleमनोज जरांगे पाटील बॅकफुटवर, मुंबईला न येता भांबेरीवरुन परतले अंतरवाली सराटीत पहा कारण …
    Next Article Next Post
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.