गंगापूर खुलताबाद तालुक्यात भाजपमध्ये इन्कमिंग सुरू
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सचिन विधाटे यांची एन्ट्री विशेष
१५ दिवसात ४,५००कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश यामध्ये सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांची एन्ट्री
गंगापूर खुलताबाद तालुक्याचे आमदार प्रशांत बंब यांनी तालुक्यात जादूची काडी फिरवल्याची चित्र दिसून येत आहे.
तब्बल पंधरा दिवसात गंगापूर व खुलताबाद तालुक्यात तब्बल साडेचार हजार कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला असून यामध्ये सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी एन्ट्री केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सचिन विधाटे यांची एन्ट्री यामध्ये विशेष ठरली आहे.
ज्या दिवशी गंगापूर मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे आले त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी आमदार प्रशांत बंब यांच्या नेतृत्वाखाली साडेसहाशे कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला यामध्ये विविध गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी प्रक्ष प्रवेश केला आहे.
यामध्ये सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते.
गंगापूर खुलताबाद तालुक्यातून पंधरा दिवसात तब्बल साडेचार हजार कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे.
यामुळे आमदार प्रशांत बंब यांनी जादूची कांडी फिरवली काय अशीच चर्चा संध्या विविध पक्षांमध्ये रंगत असून इतर पक्षाला मात्र याची धास्ती बसली असून गंगापूर खुलताबाद तालुक्यातील पुन्हा प्रशांत बंबच हे आपला झेंडा रोवतात काय अशीच चर्चा आता तालुका भर पसरत आहे.
तांदुळवाडी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये मोठा पक्षप्रवेश झाला असून यावेळी आमदार प्रशांत बंब, भाजप ज्येष्ठ नेते किशोरजी धनायत भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, नंदकुमार गांधीले ,माजी पंचायत समिती सदस्य कृष्णा सुकासे, सरपंच विक्रम राऊत, अतुल रासकर, कृष्णकांत व्यवहारे रामेश्वर गवळी ज्ञानेश्वर मस्के,नवनाथ सुराशे, आप्पासाहेब पाचपुते ,सुनील मुळे, आशीर्वाद रोडगे, प्रदीप पाटील ,अरुण सागर ,राजू गावंडे, प्रशांत मुळे ,वैभव विधाते, संतोष विधाते ,संदीप बोजवारे, विकास दुबिले ,सचिन दुबिले ,रमेश नारळकर, अशोक विधाते, हशम पटेल, अजीम पटेल, किशोर नरोडे, सुनील पाखरे, भास्कर शिंदे, आदीसह भाजपा कार्यकर्ते व पदअधिकारी उपस्थित होते.