दगडावर दुचाकी उसळली युवकाचा जागीच मृत्यू
लोणी/ रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात एकजण ठार झाला. ही घटना रविवारी दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास आर्णी – दारव्हा मार्गावरील लोणी गावाजवळ घडली. मनोज भिकूसिंग राठोड (३८) रा. खेड, ता. आर्णी असे मृताचे नाव आहे.
मनोज राठोड हा दुचाकीने जवळा येथून गावी खेड येथे जात होता. साईडपट्ट्या भरण्यासाठी टाकण्यात आलेल्या मोठ्या दगडावर त्याची
दुचाकी आदळली. यात डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.
लोणी ते जवळा रस्त्याचे काम काही दिवसांपूर्वी करण्यात आले. साईटपट्ट्यावर मोठे दगड टाकण्यात आले आहे. काही ठिकाणी मुरुमाचा वापर करण्यात आला. या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. साईडला टाकलेले दगड चालकाला दिसत नसल्याने अपघात होत आहे. सदोष कामामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.