गवांदे क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा JEE (Main) परीक्षेत गणित (MATHS) विषयात निकालाचा उच्चांक !
नुकत्याच जाहीर झालेल्या JEE (Main) 2024 च्या परिक्षेत पहिल्याच attempt मध्ये गवांदे क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी गणित (Maths) विषयात घवघवीत यश संपादन करून निकालाचा उच्चांक प्रस्थापित केला आहे.
राष्ट्रीय पातळीवर अभियांत्रिकी साठी JEE (Main) ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचे वर्षभरात दोन attempt असतात पहिला जानेवारी मध्ये व दुसरा एप्रिल मध्ये , जानेवारीच्या पहिल्याच प्रयत्नात गवांदे क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी गणित (Maths) विषयात नेत्रदीपक यश मिळवून गवांदे क्लासेसचे यश पक्के…. शंभर टक्के हे ब्रीदवाक्य खरे करून दाखविले आहे.
सदर परीक्षेत आदित्य वांढेकर -९७.९८ , प्रशांत कराळे-९४.५३ , सत्यम पालवे-९४.१० , आयुष आंधळे-९४.०८, कु. प्रांजल धावडे-९१.६५, किरण बोठे -८५.०९, प्रज्वल चव्हाण-८३.५३, शहाराम शेळके-८२.९८, श्रीकांत नाईक-८०.७७, आदित्य झरेकर-८०.२२, या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले आहे. तसेच कु.साक्षी कार्ले, वेदांत राठोड, वेदांत सांगळे, कु. वैष्णवी नागदे, कु. वैष्णवी निवडुंगे, कु. कांचन दहातोंडे, सुजित अडसूळ, वेदांत नेहुल, कु. भक्ती काळे, कु. पोर्णिमा पोटे, कु. देवकी निंबाळकर, आणि कु. स्नेहल होळकर या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले आहे. गवांदे क्लासेसचे जवळपास २७ विद्यार्थी पहिल्याच प्रयत्नात JEE (Advance) म्हणजेच IIT च्या प्रवेश परीक्षेसाठी पात्र ठरतील.
वर्षभर क्लासेसमध्ये असणारे सातत्य, दर आठवड्याला होणारी परीक्षा, शेवटी असणाऱ्या सराव परीक्षा, आणि विद्यार्थ्यांचे अथक परिश्रम यातूनच विद्यार्थ्यांनी यश मिळविले यश मिळवले असे क्लासेसचे संचालक प्रा. प्रभाकर गवांदे यांनी सांगितले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे क्लासेसचे संचालक प्रा. प्रभाकर गवांदे, सौ, छायाताई गवांदे, व्यवस्थापक युवराज महांडुळे आणि व्यवस्थापिका मोनाली पवार, किशोर गिते आदींनी अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
गवांदे क्लासेसने मागील २० वर्षापासून निकालाची उच्च परंपरा या वर्षीही कायम जोपासली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनी गवांदे क्लासेसचे संचालक प्रा. गवांदे सरांची गणित विषय सोप्या पद्धतीने शिकविण्याचे कौशल्य, प्रदीर्घ अनुभव आणि फक्त क्लासेसच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केलेल्या अत्याधुनिक-अद्यावत ई -सुविधा यामुळेच एवढे अभूतपूर्व यश मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सदरील विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल प्रा. गवांदे सर यांनी यावेळी सांगितले की आम्ही कठोर परिश्रमावर भर देतो. विशेष करून ११वी मध्ये पाया पक्का करण्यावर भर देतो. मूलभूत संकल्पना जास्तीत जास्त स्पष्ट करतो. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी उत्तुंग यश मिळवितो. यावर्षी विद्यार्थ्यांनी परीक्षेत मिळविलेले यश उल्लेखनीय आहे. उजळणी आणि सराव यावरती जास्त भर देऊन विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली.
क्लासेसच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रेरित करणारा उत्कृष्ट शिक्षक अशी प्रा. गवांदे सरांची ख्याती विद्यार्थी वर्गामध्ये ऐकायला मिळते. त्यांचा सुट्टीचा योग्य वापर करण्यावर भर असतो. रविवारी उन्हाळी सुट्टी व दिवाळी सुट्टीत ज्यादा क्लासेस घेतले जातात. बोर्ड आणि प्रवेश परीक्षेसाठी जास्तीत जास्त सराव पेपर वर्गात सोडवून घेतले जातात.
या क्लासेसच्या अद्यावत व अभिनव सेवा -सुविधा ही या क्लासेसचे स्वतःचे काही वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांमध्ये चर्चिले जातात. गवांदे क्लासेस ने पुणे पॅटर्नच्या धरतीवरच्या सुविधा अल्प फी मध्ये नगर मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत. ते म्हणजे विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष ठेवण्यासाठी २४ CCTV कॅमेरे, विद्यार्थ्यांच्या दैनंदिन हजेरीसाठी बायोमेट्रिक सिस्टीम पालकांना वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या प्रगतीची SMS द्वारे माहिती कळविली जाते. अद्यावत डिजिटल साऊंड सिस्टिम On -line test साठी भव्य कम्प्युटर लॅब, क्लासेसचे मध्यवर्ती ठिकाण, बोर्ड CET &JEE साठी भव्य ग्रंथालय आणि स्वतंत्र अभ्यासिका, पार्किंगची मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था आणि मुलींसाठी स्वतंत्र लेडीज रूम, लेडीज यशाची १०० टक्के खात्री यामुळे विद्यार्थी व यांच्यामध्ये या क्लासमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी प्राधान्य दिले जात असल्याचे बोलले जाते.
प्रा. गवांदे सर हे स्वतः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे गणित विषयातील सुवर्णपदक विजेते आहेत. त्यांना ११वी व १२वी गणित शिकविण्याचा २२ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. परंतु दरवर्षी विद्यार्थ्यांना नवीन काहीतरी देण्यावर त्यांचा भर असतो. आजही ते स्वतः दिवसातील १४ते १५ तास क्लासमध्ये विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करताना दिसतात. त्यामुळेच कदाचित अवघड गणित अतिशय सोपे करून शिकविण्याची वरचा त्यांच्या कलेचा लौकिक झालेला असावा. गवांदे क्लासेस मध्ये इ.११वी व १२ गणिताच्या बोर्ड, CET &JEE साठी मार्गदर्शन वर्ग चालतात.
सध्या ११वी विज्ञान मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १२वी, MHT -CET& JEE तसेच १२वी बोर्डाची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी क्रॅश कोर्स या बॅचेसची प्रवेश प्रक्रिया चालू आहे. तरी आपल्या उज्वल भविष्यासाठी विद्यार्थी व पालकांनी कार्यालयाशी संपर्क साधून प्रवेश निश्चित करावेत असे प्रा. प्रभाकर गवांदे सर यांनी कळविले आहे.