हाय राईज इमारतींचे काम करताना भूगर्भातील पाया कश्या प्रकारचा आहे याचा अभ्यास करण्यासाठी जिओटेक्निकल इंव्हेस्टिगेशन करणे अत्यावश्यक. – इंजि. वैशाखी सोमाणी – हिरे.
एसा नॉलेज सीरिज पॉवरड बाय पोलाद स्टील जालना अंतर्गत जिओटेक्निकल कन्सल्टंट वैशाखी सोमाणी – हिरे यांचे जिओटेक्निकल इंव्हेस्टिगेशन – गरज आणि फायदे या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी बोलताना त्यांनी पूर्वी आपल्या शहरामध्ये इमारती तीन चार मजल्यापर्यंत मर्यादित होत्या. परंतु आता बहुमजली इमारतीचे प्रमाण वाढले असून त्याचे आर सी सी डिझाइन करताना जिओ टेक्निकल इंव्हेस्टिगेशन करूनच डिझाइन करणे आवश्यक आहे. पूर्वी डिझायनर एक अंदाजे मुरूम अथवा भूगर्भात उपलब्ध मातीची सेफ बिअरींग कॅपॅसिटी गृहीत धरून डिझाईन करत असत. परंतु उपलब्ध पायाला मुरूम अथवा माती कितपत वरील स्ट्रक्चरचे वजन घेऊ शकेल याचा वेगवेगळ्या टेस्ट घेऊन तपासणी करणे आवश्यक आहे. वैशाखी हिरे यांनी जियो टेक्निकल इंव्हेस्टिगेशन म्हणजे काय, त्याची आवश्यकता आणि महत्व, त्यासाठी सेफ बिअरींग कपॅसिटी काढण्याच्या पद्धती, इंव्हेस्टिगेशन करण्याच्या पद्धती, ती कश्या प्रकारे करतात, त्याचे फायदे. उपलब्ध क्षेत्रा प्रमाणे बोअर होल ची संख्या फायनल करणे, त्यासाठी लागणारा वेळ आणि खर्च तसेच विविध केस स्टडीच्या माध्यमातुन यामुळे होणारी खर्चात बचत याविषयी विस्तृत माहिती दिली. या प्रकारच्या विविध टेस्ट च्या माध्यमातून ज्या पायावर आपल्याला इमारत उभी करायची आहे तो कश्या प्रकारचा आहे आणि त्यावर कश्या प्रकारे डिझाइन केले पाहिजे याचा योग्य निर्णय घेणे शक्य होते. कुठल्याही प्रकारचे अंदाज बांधून डिझाइन करण्याची गरज पडत नाही असे विविध फायदे असल्याचे सांगितले. यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करून बोअर होल सँपल जमा करून प्रयोग शाळेत त्यावर विविध टेस्ट घेऊन शास्त्रीय पद्धतीने त्याचे परीक्षण करणे शक्य होते. या कार्यक्रमासाठी एसा अध्यक्ष रमेश कार्ले, उदित हिरे, मयुरेश देशमुख, प्रीतेश पाटोळे, सुनिल औटी, अशोक सातकर, प्रशांत आढाव, संकेत पादिर पोलाद स्टीलचे आदेश गूंगे, अजिंक्य बालटे, राजकुमार मुनोत, जितेश सचदेव, स्ट्रोंग टेक लॅब चे राजाराम पुजारी आणि संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालक यश शहा यांनी सुत्र संचालन केले , सहसचिव यश शहा यांनी अतिथी यांचा परिचय करून दिला तर सचिव प्रदिप तांदळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.