अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधक विधान भवन च्या पायऱ्यावर आक्रमक
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईमध्ये पार पडत असून राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्याचा सरकारवर आरोप विरोधकाकडून केला जात असल्याने आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधान भवन च्या पायऱ्यावर राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राज्यात आज घरोघरी गोळीबार होत असून गुंडाराज सुरू आहे. गेली ती शिवशाही आली गुंडशाही आज का राज गुंडाराज
गुंडांना पोसणाऱ्या , संरक्षण देणाऱ्या सरकारचा धिक्कार असे गुंडांना संरक्षण देणाऱ्या, सरकारचा धिक्कार असो
नेलं काय घरोघरी, गोळीबारी गोळीबारी आदी घोषणांनी विरोधकांनी आज विधीमंडळांच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत विधिमंडळ परिसर दणाणून सोडला.
प्रतिनिधी अनुभव भागवत मुंबई.