पत्नी घरी नसताना तिला सारखं घरी बोलवायचा, अखेर एक दिवस असा भरला पापांचा घडा
मुंबई : मुंबई पोलिसांनी एका 42 वर्षाच्या व्यक्तीला बलात्काराच्या आरोपाखाली अटक केलीय. आरोपीने जवळच्या महिला नातेवाईकावर अनेकदा बलात्कार केला. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अखेर सोमवारी आरोपीला अटक केली. मुंबईचा उपनगरीय भाग वांद्र्यातील ही घटना आहे. आरोपी महिलेला वांद्र्यातील आपल्या घरी बोलवून तिच लैंगिक शोषण करत होता. मुंबई पोलिसाच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला ही माहिती दिली. महिलेवर त्याने अनेकदा अत्याचार केला. पत्नी घरी नसताना आरोपी महिला नातेवाईकाला घरी बोलवायचा व तिच्यावर अत्याचार करायचा.
कोणाला काही बोललीस, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी त्याने पीडित महिलेला दिली होती. आरोपीच्या धमक्यांच महिलेवर दडपण होतं, ती घाबरलेली. एकदिवस अचानक तिची तब्येत बिघडली. ती डॉक्टरकडे गेली, त्यावेळी तिला समजलं की, ती गर्भवती आहे. हे समजल्यानंतर महिलेला धक्का बसला. तिने पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला.
पीडित महिलेने संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन स्वत:सोबत जे घडलं, ते सर्व सांगितलं. पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, त्यांनी आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 376 (बलात्कार) आणि अन्य तरतुदींतर्गत गुन्हा नोंदवलाय.