Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Breaking»मनसे नेते वसंत मोरे यांनी घेतली शरद पवार यांची भेट, काय झाली चर्चा.
    Breaking

    मनसे नेते वसंत मोरे यांनी घेतली शरद पवार यांची भेट, काय झाली चर्चा.

    newstoday24By newstoday24February 27, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    राजकारणातील मोठी बातमी, मनसे नेते वसंत मोरे यांनी घेतली शरद पवार यांची भेट, काय झाली चर्चा

    गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे मनसेत नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी वसंत मोरे यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख नेते शरद पवार यांची भेट घेतली. पुणे येथील निसर्ग मंगल कार्यालयात वसंत मोरे यांनी शरद पवार यांची भेट झाली.

    4 | पुणे लोकसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुणे लोकसभेची तयारी जोरात सुरु आहे. मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पुणे लोकसभेची जबाबदारी दिली आहे. यामुळे अमित ठाकरे यांचे पुणे दौरे वाढले आहेत. मनसेतून वसंत मोरे आणि साईनाथ बाबर या दोघांनी उघडपणे आपली लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच नुकतेच राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी या निवडणुसंदर्भात संकेत दिले होते. त्यांनी म्हटले होते की, साईनाथ बाबर यांना मला वरच्या पदावर पहायचं आहे. त्यांना आता महापालिकेत पाठवायचे नाही. त्यांना दिल्लीत पाठवले तर दुधात साखर पडेल. यामुळे मनसेत साईनाथ बाबर यांचा दावा मजबूत झाला आहे.

    गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे मनसेत नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी वसंत मोरे यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख नेते शरद पवार यांची भेट घेतली. पुणे येथील निसर्ग मंगल कार्यालयात वसंत मोरे यांनी शरद पवार यांची भेट झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यामुळे नाराज असलेले वसंत मोरे राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणार की काय? अशी चर्चा सुरु झाली आहे.

    बारामती लोकसभा मतदार संघासोबत चर्चा सुरु असताना मनसे नेते सरळ शरद पवार यांना जाऊन भेटले. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर वसंत मोरे यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला. यावेळी ही राजकीय भेट नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले. आपण नाराज असल्याच्या बातम्या माध्यमांमधून येत आहेत.

    #Breaking #Update #Ncp #Mns
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleअयोध्या आणि श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन बांधणार – अजित पवारांची घोषणा
    Next Article सेवानिवृत एसटी कामगारांनी फुंकले थकित देयकांसाठी राज्यव्यापी आंदोलनाचे रणशिंग
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.