अहमदनगर जिल्हा सिलंबम असोसिएशन संस्थेला मान्यता जिल्हाध्यक्षपदी पै. नाना डोंगरे यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या शारीरिक व शैक्षणिक विकासासाठी स्थापना करण्यात आलेल्या अहमदनगर जिल्हा सिलंबम असोसिएशन संस्थेला सहाय्यक संस्था निबंध कार्यालयाची (धर्मदाय आयुक्त) नुकतीच मान्यता मिळाली. या संस्थेच्या संस्थापक जिल्हाध्यक्षपदी पै. नाना डोंगरे यांची नियुक्ती झाली आहे.
अहमदनगर जिल्हा सिलंबम असोसिएशनच्या माध्यमातून जिल्ह्यासह राज्यात विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करुन नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाणार आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आधार देऊन क्रीडा व शिक्षण क्षेत्रात प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या संस्थेच्या उपाध्यक्षपदी अक्षय ठाणगे, सचिवपदी संदीप डोंगरे, खजिनदारपदी प्रतिभा डोंगरे, सदस्यपदी बाळू भापकर, प्रमोद येवले, अभिषेक वाबळे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. संस्थेच्या नोंदणीसाठी कायदेशीर सल्लागार म्हणून ॲड. राजेंद्र वाबळे यांनी काम पाहिले.