सावेडी ग्रामस्थांच्या वतीने अजय बारस्कर उर्फ खंडू यांचा जाहीर निषेध
सावेडी ग्रामस्थांचा अजय बारस्कर यांच्याशी कुठलाही संबंध नाही
अहमदनगर प्रतिनिधी: अजय बारस्कर यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध चुकीचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे समस्त सावेडी गावाच्या वतीने अजय बारस्कर उर्फ खंडू यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे तसेच सावेडी गाव देखील मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा देत पूर्ण ताकतीने त्यांच्यासोबत उभा राहील. अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये समस्त सावेडी गावाच्या ग्रामस्थांनी दिली.
यावेळी भरत खकाळ, संजय आडोळे,राजेंद्र बारस्कर, सचिन बारस्कर, चंद्रकांत बारस्कर, रवींद्र वाकळे,महेश काळे,मनोज बारस्कर, दिलीप वाकळे, विजय दंडवते, राजेंद्र वाकळे, केशव वाकळे,आदी सावेडी ग्रामस्थ उपस्थित होते
सावेडी गावाचा कुठलाही निर्णय सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन ठरवत असतात परंतु या अजय बारस्कर यांनी जे काही वक्तव्य केले आहे त्या वक्तव्याशी सावेडी गावाच्या ग्रामस्थांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही हा त्यांच्या व्यक्तिगत फायद्यासाठी त्यांनी केले आहे. त्यांना वक्तव्य केल्यानंतर हे ग्रामस्थांनी समजून सांगायचा प्रयत्न केला परंतु त्यांचे कुठलीही ऐकायची भूमिका नाही मराठा समाज विरोधी त्यांची भूमिका असल्याचे स्पष्ट होत आहे असे देखील पत्रकार परिषद मध्ये ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले