Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»
    Ahmednagar

    newstoday24By newstoday24February 28, 2024No Comments1 Min Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    माजी सरपंच संदीप वराळ खून प्रकरण निकाली काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

     

    नगर : निघोज येथील माजी सरपंच संदीप वराळ खून प्रकरणाचा निकाल लवकर लावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.याप्रकरणी या खटल्यातील आरोपी बबन कवाद याने सर्वोच्च न्यायालयाकडे याचिका दाखल केली होती. यातील आरोपी कवाद जामिनावर बाहेर असून, अ. नगर व पुणे जिल्ह्यात वराळ खून प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत प्रवेश करण्यास त्याला मनाई केलेली आहे. वराळ खून प्रकरणास सात वर्षे उलटूनही निकाली लागत नाही.

    म्हणून आरोपी कवाद याने त्याच्यावरील दोन जिल्ह्यातील प्रवेश बंदीची अट शिथिल करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती; परंतु प्रवेश बंदी शिथिल करण्यासाठी दिलेले कारण योग्य वाटत नाही, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या मागणीस नकार दिला. या घटनेला अनेक वर्षे उलटूनही खटला निकाली निघत नाही म्हणून न्यायालयाने नाराजी व्यक्त करतया प्रकरणाची दखल घेऊन हा खटला लवकरात लवकर निकाली काढावा, असे निर्देश अहमदनगर सत्र न्यायालयाला दिले आहेत. या प्रकरणाची सुनावनी न्यायमूर्ती अनिवृध्द बोस व न्यायमूर्त संजय कुमार यांच्या न्याय पिठासमोर झाली. याचिकाकर्ता बबन कवाद यांची बाजू अॅड. प्रज्ञा तळेकर, अजिंक्य काळे व पुलकित अग्रवाल यांनी मांडली.

    #Ahmednagar #Breaking #Update #news Crime #Police
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous ArticlePrevious Post
    Next Article अमोल कोल्हेंच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी भाजप आमदाराने दंड थोपटले; म्हणाले, शिरूरमध्ये…
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.