फ्रीडम स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
अकोट : स्थानिक गजानन नगर स्थित फ्रीड्म इंग्लिश स्कूल,आकोट येथे राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधाला “रामन इफेक्ट” असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस “राष्ट्रीय विज्ञान दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. सर्वप्रथम वर्ग 7 वी च्या विद्यार्थ्यांच्या हस्ते डॉ. सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेला कुंकुमतिलक, हारार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी फ्रीडम बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मनोज झाडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शाळा समितीचे अध्यक्ष प्रवीण झाडे, इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका अरुणा ताले,पर्यवेक्षक विजय रेवस्कार,विभाग प्रमुख निखिल अनोकार, विक्रांत चंदनशिव, सहाय्यक शिक्षिका कु.राखी वांगे, कु.वर्षा महल्ले, मयुरी अकोटकर, पूजा बेराड, ऐश्वर्या बोडखे, वंदना राऊत निशा हाडोळे, हर्षाली खाडे, प्रीती सोनोने, रेखा अकोटकर, पूजा डाबेराव,नेहा अंबळकार इ. उपस्थित होत्या. अध्यक्ष तथा प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून बालवैज्ञानिकांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. वर्ग 7 वी चे विद्यार्थी कु.प्राची सावळे, स्वरांगी फुलारी, दिशा बोडखे, दिया बोडखे, दिव्या बेलोकार, मेहुल गयधर, यश बेराड, समीक्षा उमाळे, वर्ग 6 वी चे वसुंधरा पुंडकर, अदिती गावंडे यांनी आपल्या भाषणांमधून वेगवेगळे वैज्ञानिक व त्यांच्या संशोधनाबद्दल माहिती दिली.कु.माधुरी अवारे यांनी आपल्या कलाकृतीतून चंद्रयान ची प्रतिकृती बनवून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक वातावरणाची अनूभूती करून दिली. विद्यार्थ्यांनी चंद्रयान सोबत फोटो काढून आनंद घेतला. राज्यस्तरावर मॉडेल निवड पात्र ठरलेल्या विज्ञान शिक्षिका कु.मयुरी अकोटकर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रतिज्ञा म्हटली.प्रास्ताविक मुख्याध्यापिका अरुणा ताले यांनी केले.सूत्र संचालन विद्यार्थीनी कृष्णाली भांडे व प्रणाली मावळे तर आभार प्रदर्शन अक्षरा जायले यांनी केले. विज्ञान विषयावर सुबक रांगोळी रेखाटन कु.माही गुजर, लावण्या बोडखे, अनुष्का बोडखे यांनी केले. उत्कृष्ट फलक लेखन कु पूजा डाबेराव व रेखा अकोटकर यांनी केले. कार्यक्रमाकरिता शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. असे प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आले