Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Breaking»पोलीस भरती स्वप्नच राहिलं; तरुणानं संपवलं आयु्ष्य, सुसाईड नोटमध्ये वाहतूक पोलिसांची नावं
    Breaking

    पोलीस भरती स्वप्नच राहिलं; तरुणानं संपवलं आयु्ष्य, सुसाईड नोटमध्ये वाहतूक पोलिसांची नावं

    newstoday24By newstoday24February 29, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पोलीस भरती स्वप्नच राहिलं; तरुणानं संपवलं आयु्ष्य, सुसाईड नोटमध्ये वाहतूक पोलिसांची नावं

     

    भारतीय लष्कर आणि पोलीस दलामध्ये भरती होण्याची स्वप्न बघणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना ठाण्यातून समोर आली आहे. ड्रिंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल झाल्यामुळे आता आपलं करियर संपणार या भीतीमधून नैराश्य आल्यानं या तरुणानं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान आत्महत्येपूर्वी या तरुणानं सुसाईड नोट देखील आपल्या आईच्या मोबाईलवर पाठवली आहे. त्यामध्ये काही वाहतूक पोलिसांची नावं असल्याची माहिती समोर आली आहे. मनीष उतेकर असं या तरुणाचं नाव आहे. सुसाईड नोटमध्ये पोलिसांची नावं घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आत्महत्या करणारा तरुण मनीष उतेकर हा ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात राहात होता. त्याला पोलीसदल किंवा आर्मीमध्ये भरती होण्याची इच्छा होती. त्यासाठी त्याने तयारी देखील सुरू केली होती. तो स्पर्धा परीक्षा देत होता. मात्र या तरुणाने आपल्या राहात्या घरात आईच्या साडीने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवल्यानं खळबळ उडाली आहे. त्याने आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट देखील आपल्या आईला पाठवली आहे. या सुसाईड नोटमध्ये काही वाहतूक पोलिसांची नावं असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेप्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाहीये, तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

    सुसाईड नोटमध्ये काय म्हटलं? मनीष याने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या आईच्या मोबाईलवर एक सुसाईड नोट पाठवली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्यानं म्हटलं की, गटारी अमावस्याच्या दिवशी त्याने त्याच्या काही मित्रांसोबत मद्यपान केलं. त्यानंतर मद्यपान करून वाहनं चालवत असताना त्याला वाहतूक पोलिसांनी ठाणे पूर्वेतील कोपरी परिसरात अडवलं. त्याच्याविरोधात ड्रिंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने दोन दिवस पोलिसांना गुन्हा मागे घेण्याची विनंती केली तसेच दंड भरतो म्हणून सांगितले देखील, मात्र पोलिसांनी त्याला कोर्टात जाण्यास सांगितले. कोर्टात गेल्यास करिअर संपेल या भीतामधून त्याने आत्महत्या केली. तसेच संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी तुझ करिअर बरबाद करणार अशी धमकी दिल्याचा दावाही या सुसाईड नोटमध्ये त्याने केला आहे. या प्रकरणात काही वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी नावं त्यानं सुसाईड नोटमध्ये लिहीली आहेत.

    #Breaking #Update #News #Crime #Police #Boy
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous ArticlePrevious Post
    Next Article नात्याला काळीमा! वडिलांचा लेकीवर अत्याचार; पत्नी आणि मुलालाही…
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.