नात्याला काळीमा! वडिलांचा लेकीवर अत्याचार; पत्नी आणि मुलालाही…
उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. गोरखनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बापाने आपल्या मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या नराधम बापाने पत्नी आणि मुलालाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचं समोर आलं आहे.
आपल्या वडिलांच्या त्रासाला कंटाळून मुलीने त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आरोपी पित्याला पकडण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असल्याची माहिती वृत्तानुसार मिळत आहे. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत. पीडित मुलीने पोलिसांना सांगितलं की, तिचे वडील अनेक दिवसांपासून तिचा विनयभंग करत होते. छेडछाड करताना अश्लील व्हिडिओही दाखवत होते. तिने विरोध केल्यावर मुलीला बेदम मारहाण केली जात होती. वडिलांनी केलेल्या सतत मारहाणीमुळे मुलीची नजर कमजोर झाली आहे.
तिने नकार दिल्यास तिच्या आई आणि भावाला जीवे मारलं जाईल, अशी धमकी तिच्या वडिलांनी दिली (Crime News) होती. ती जेव्हा तिच्या वडिलांचं ऐकत नाही, तेव्हा ते घरात प्रचंड गोंधळ घालतात. जेव्हा आई आणि भाऊ त्यांना सोडवायला येतात, तेव्हा ते त्यांनाही बेदम मारहाण करतात. अशी माहिती पीडितेने पोलिसांना दिली आहे.
वडिलांच्या अश्लील कृत्यामुळं घरातील संपूर्ण वातावरण बिघडत असल्याचं पीडितेने पोलिसांना सांगितलं आहे. भीतीपोटी तिने वडिलांचं कृत्य बराच काळ सहन केलं. आता दररोज अशा घटनांमुळे ती हैराण झाली आहे. या नरकमय जीवनातून सुटका होणं गरजेचं झालं आहे. यातून तिला सुटका करण्यासाठी तिने पोलिसांची मदत मागितली आहे. याप्रकरणी गोरखपूरचे पोलीस अधिकारी योगेंद्र सिंह यांनी सांगितलं की, पीडितेच्या तक्रारीच्या आधारे वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पीडितेच्या घरी गेले. आरोपी तेथून पळून गेले होते. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपी वडिलांना लवकरच अटक करण्यात येईल. आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल.