१७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा ७ दिवसात शोध लावून राहुरी पोलिसांनी दिले पालकांच्या ताब्यात.
अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे ऑपरेशन मुस्कान संकल्पनेतून राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतून गेल्या ३ वर्षांमध्ये मिळून न आलेल्या 16 मुली पैकी मागील एक महिन्यापासून आज पर्यंत १२ मुलीचा शोध लावून त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यत देण्यात आल्या आहेत.
राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सतरावर्षीय अल्पवयीन मुलीस कुणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेल्याबाबत राहुरी पोलीस स्टेशन गु. र.न.185/2024 भा द वि कलम 363 अन्वये गुन्हा दिनांक. 22/2/2024 रोजी दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्हातील पीडीतेचा व पिडीतेस पळवून नेणाऱ्या आरोपीचा तांत्रिक विश्लेषण आधारे शोध घेतला असता सदर पीडितेस आरडगाव येथून ताब्यात घेतले असून पालकांचे ताब्यात देऊन नमूद आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे ,चंद्रकांत बोराटे ,वाल्मीक पारधी, आजिनाथ पालवे, अंकुश भोसले, रोहिदास नवगिरे, सतीश कुराडे यांच्या पथकाने केली. राहुरी पोलीस स्टेशन येथे मागील तीन वर्षातील मिळून न आलेल्या 16 मुली पैकी मागील एक महिन्यापासून आज पावेतो 12 मुलीचा शोध घेण्यात आला असून एकूण 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब यांचे ऑपरेशन मुस्कान संकल्पनेतून व मार्गदर्शनातून ,तसेच अप्पर पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे , विभागीय पोलीस अधिकारी डॉ श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात लेखनिक हवालदार साळवे, कार्यालयीन लेखनिक पाखरे, अमोल गायकवाड , सम्राट गायकवाड,अशोक शिंदे, रोहकले ,राहुल यादव, सुरज गायकवाड, नदीम शेख, प्रवीण बागुल यांनी तांत्रिक विश्लेषण आधारे केलेली आहे.
अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणे तथा लैंगिक अत्याचार करणे अशा गुन्ह्यात कुणाकडून अनवधानाने सहकार्य /मदत झाली असल्यास वा कुणास अशा प्रकारच्या गुन्ह्याबाबत माहिती असल्यास त्यांनी सदर माहिती पोलिसांना पुरवावी. त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.