केडगाव एकता कॉलनी गणपती मंदिर सभामंडप कामाचे भूमिपूजन संपन्न
विघ्नसंतोषी लोकांनी धार्मिकतेत तरी राजकारण करू नये – उद्योजक सचिन कोतकर
नगर : अध्यात्मिक व धार्मिकतेच्या माध्यमातून आपल्या परंपरा व संस्कृतीचे जतन होत असते, एकता कॉलनीतीळ नागरिकांनी एकता ठेवत गणपती मंदिराची उभारणी केली त्यामुळे समाज जोडला गेला आहे, यासाठी वर्षभर विविध सण उत्सव धार्मिक कार्यक्रम सभा मंडपाची आवश्यकता होती यासाठी सामाजिक कार्यकर्ते जालिंदर कोतकर यांनी खा, डॉ, सुजय विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करत सभामंडप बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला असून याचबरोबर केडगाव परिसरातील ११ मंदिरांसमोर सभा मंडप उभे राहणार असून या माध्यमातून समाजात मोठ्या उत्साहात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल व धार्मिकतेची गोडी निर्माण होईल, हिंदू धर्मात मंदिरांना मोठे महत्व असून समाज वर्गणीच्या माध्यमातून आपापल्या परिसरात मंदिरांची उभारणी करत असतात, केडगाव परिसरात विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहे,त्यामुळे भविष्यात केडगाव विकसित उपनगर म्हणून ओळखले जाईल, माजी महापौर संदीप कोतकर यांनी विकासाची मुहूर्तमेढ रोवली असून ते पूर्णत्वाकडे नेण्याचे काम सुरु आहे, मात्र विघ्नसंतोषी लोकं विकासाच्या व देवाच्या कामात खोडा घालण्याचे काम करत असतात त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी धार्मिकतेत तरी राजकारण करू नये असे प्रतिपादन उद्योजक सचिन कोतकर यांनी केले,
खा, डॉ, सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून केडगाव एकता कॉलनी गणपती मंदिर सभामंडप कामाचे भूमिपूजन उद्योजक सचिन कोतकर यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी सामाजिक कार्यकर्ते जालिंदर कोतकर, माजी नगरसेवक मनोज कोतकर, सुनील कोतकर, सुरज शेळके, गणेश नन्नवरे, क्षिरसागर महाराज, अजित कोतकर, पोपट कराळे, अशोक कराळे, भरत ठुबे, मधुकर चिपाडे, उमेश कोतकर, संतोष गाडे, अजित शेळके, चंद्रकांत कचरे, प्रकाश लोंढे, सुधाकर गुळवणी, अतुल कोठारी, हर्षल काकडे, वैभव चिपाडे, अजय भापकर, विनायक पावसे, उमेश क्षिरसागर, डॉ.खेतमाळस, बनकर आण्णा, बाळासाहेब राऊत, अभिजित आरले, विकास शेळके यांसह प्रभाग क्रमांक 17 मधील ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते जालिंदर कोतकर म्हणाले की, खा, सुजय विखे पाटील यांनी नेहमीच विकास कामासाठी मोठा निधी देत केडगावकरांना झुकते माप दिले असून नुकतेच शहर विकासासाठी २० कोटी रुपये निधी मंजूर झाला असून त्यात २ कोटी रुपये केडगावच्या विकास कामांसाठी दिला आहे, खा, सुजय विखे पाटील यांनी केडगावच्या महिलांना शिर्डीचे साई बाबा व शनीशिंगणापूर येथील शनी देवाचे दर्शन घडवण्याचे काम केले, तसेच विजेचा प्रश्न कायमचा मार्गी लागावा यासाठी २०० केव्हीचे ५ ट्रान्स्फार्मर मंजूर केले असून काम पूर्णत्वाकडे जात आहे, उद्योजक सचिन कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली केडगावच्या विकासाची कामे सुरु असून जसजसा निधी उपलब्ध होईल तसतसे टप्प्याटप्प्याने विकास कामे केली जातील असे ते म्हणाले.
यावेळी मा. नगरसेवक मनोज कोतकर यांचेही भाषण झाले, सूत्रसंचालन महेश मोहिते, प्रास्ताविक कचरे काका यांनी केले