Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Breaking»
    Breaking

    newstoday24By newstoday24March 1, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    डबल मर्डरने शहर हादरलं, दलदलीत लपून बसलेल्या सायको किलरला अखेर अटक !

    पालघर : पालघरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दुहेरी हत्याकांडाच्या घटनेमुळे पालघर हादरलं. तारापुर येथील कुडण येथे दोन व्यक्तींवर कुऱ्हाडीने वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडसकीस आला. भीमराव पाटील आणि मुकुंद पाटील अशी मृतांची नावे आहेत. आरोपीने त्यांची हत्या केल्यानंतर आणखी एका इसमाच्या घरावरही हल्ला केलो होता. मारेकरी हा सायको किलर असल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्याबद्दल कळताच आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी आरडाओरडा करताच आरोपी तेथून फरार झाला. हत्येनंतर तब्बल 150 पोलिसांचे पथक आरोपीच्या शोधार्थ कार्यरत होते. अखेर आरोपी हा जवळच्या जंगलातील तलावातील दलदलीमध्ये लपून बसल्याची खबर पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी आरोपीला अथक प्रयत्नांनंतर अटक केली.

    पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे कुडण गावात ही धक्कादायक घटना घडली. त्या गावात गेल्या काही दिवसांपासून एक अज्ञात इसम संशयास्पद रितीने फिरत होतो. स्थानिकांच्या माहितीनुसार, तो इसम मानसिकरित्या विक्षिप्त होता, त्यामुळे कोणी त्याची दखल घेतली, त्याच्याकडे लक्षही दिलं नाही. पण गुरूवारी रात्री गावात खळबळजनक प्रकार घडला. रात्री साडेनऊच्या सुमारास त्या युवकाने एका वृद्ध व्यक्तीवर कुदळीने वार करून त्याची हत्या केली आणि तो त्याच्या मृतदेहाजवळच बसून राहिला. त्या मृत इसमाचा भाऊ त्याला शोध तिकडे आला असता, आरोपीने त्याच्यावरही कुदळीने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या त्या इसमाचादेखील घटनास्थळीच मृत्यू झाला.

    भीमराव पाटील आणि मुकुंद पाटील अशी मृतांची नावे आहेत. या दुहेरी हत्येनंतर आरोपी तेथील आणखी एका व्यक्तीच्या घराजवळ गेला आणि दारावर कुदळीने वार केले. दरवाजा बंद होता, पण आतील लोकांचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे रहिवासी धालत आले. ते पाहून आरोपी तिथून फरार झाला, अंधाराचा फायदा घएऊन तो पळून गेला आणि गावाबाहेर असलेल्या एका तलावाजवळील दलदलीत जाऊन तो लपला.

    घटनेची माहिती मिळताच पोलिस तेथे दाखल झाले. त्यानंतर सुमारे 150 पोलिसांचे पथक आरोपीच्या शोधार्थ निघाले. अथक प्रयत्नांनंतर पोलिसांनी दलदलीत लपून बसलेल्या आरोपीला बाहेर खेचले आणि अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

    #Breaking #Update #News #Crime 3Police #Murder
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleमॅच फिक्सिंग कोण करायचं हे योग्यवेळी सांगेल, अंगावर आलं तर… नाना पटोले यांचा इशारा कुणाकडे?
    Next Article अहमदनगर शहरातील सामाजिक कार्यकर्ता संदीप भांबरकरला गांजा तस्करीत अटक…
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    नगर ब्रेकिंग : धडा वेगळ मुंडके,एक पाय बाजूला अनोळखी तरुणाच्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला उलगडा 

    March 16, 2025
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.