अहमदनगर येथील विक्रीसाठी गांजा घेऊन जाणाऱ्या आरोपीला गंगापूर पोलिसांनी केला अटक
२८ किलो गांजा केला हस्तगत
संदीप भांबरकरला दिल्लीगेट येथून केले अटक
छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील ढोरेगांव येथील शिवना नदीच्या पुलाजवळील महाराष्ट्र हायवा ढाब्याजवळ गांजा अंमली पदार्थ विक्री करण्याकरीता आलेल्या इसमाला ताब्यात घेवून त्यांचेकडून २८ किलो गांजा व एक मोपेड स्कुटी असा एकुण ४,७२,२५० रूपयेचा मुद्देमाल गंगापूर पोलीसांनी जप्त केला आसून राहुल राजेश जाधव (३८) राहणार पिंपळवाडी तालुका राहता जिल्हा अहमदनगर आसे आरोपीचे नाव आहे.
तर दुसरा आरोपी
संदीप अशोक भांबरकर राः दिल्ली गेट अहमदनगर यांला दुसऱ्या दिवशी रात्री ३ वास्ता अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत एक इसम २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता मोपेड क्रमांक एम. एच १६ ए.एस८७ वरुन नेवासा अहमदनगर कडून छत्रपती संभाजीनगरकडे अंमली पदार्थ गांजाची विक्री
करण्याकरीता घेऊन जात आहे. यावरून छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील ढोरेगांव येथील शिवना नदीच्या पुलाजवळील महाराष्ट्र ढाबा परिसरात मोटारसायकल अडवुन इसमास ताब्यात घेवून नमुद पथकाने प्राप्त माहितीचे ठिकाणी सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या कडून २८ किलो गांजा तसेच एक मोपेड स्कुटी मिळून आल्याने त्यांचेविरुध्द गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया व अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले, पोलीस उपनिरीक्षक अझहर शेख,पोहेका अमोल कांबळे, अभिजित डहाळे, राहुल वडमारे, कांचन शेळके, शकील शेख, विजय नागरे संदिप राठोड, कैलास राठोड प्रविण प्रधान, भावत खाडे रिजवान शेख आदींनी सदरची कारवाई केली