बाळासाहेब तुम्ही आता विधानसभा लढा; कार्यकर्त्यांचा सुर कार्यकर्त्यांच्या बैठकीत झाला हा निर्णय
नगर – लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली असल्याचे दिसून येत आहे महानगरपालिकेमध्ये गेले 35 वर्ष नगरसेवक राहिलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या समर्थकांनी नुकतीच एक बैठक घेऊन यामध्ये विधानसभेची आता तुम्ही तयारी करा व निवडणूक लढवा असा सूर कार्यकर्त्यांनी बैठकीमध्ये जाहीरपणे मांडला.
बाळासाहेब बोराटे हे गेले 35 वर्ष नगरपालिकेचे उपाध्यक्ष त्यानंतर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक, विरोधी पक्ष नेते, नियोजन समितीचे सभापती यांसह विविध पदांवर आपल्या कार्याची छाप पाडली आहे. नुकत्याच त्यांच्या समर्थकांनी तीन दिवसापूर्वी एक बैठक नगर येथे घेतली. या बैठकीमध्ये अनेक कार्यकर्ते पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनी आपापली भूमिका मांडली.
बाळासाहेब बोराटे यांनी नगर शहरांमध्ये विविध सामाजिक, धार्मिक उपक्रमाच्या माध्यमातून एक नावलौकीक मिळविलेला आहे. त्यामुळे त्यांनी आता मागे न हटता आगामी काळामध्ये नगर शहरांमध्ये विधानसभेसाठी निवडणूक लढवावी अशी भूमिका या बैठकीमध्ये अनेक जणांनी मांडली व त्याला सर्वांनी पाठिंबा सुद्धा दिला. या बैठकीमध्ये बोराटे यांचा गेल्या 35 वर्षांमध्ये केलेल्या कामाचा आढावा सुद्धा यावेळी मांडला. श्री. बोराटे यांनी सामाजिक, धार्मिक, राजकीय, कला, क्रीडा या सर्व क्षेत्रांमध्ये योग्य तो समतोल राखलेला असल्याने आज सर्वच क्षेत्रातील व्यक्ती त्यांच्याशी आपुलकीचे नाते तयार झाले आहे.
महानगरपालिकेच्या माध्यमातून असो अथवा कुठल्याही क्षेत्रामध्ये असो नागरिकांना जिथे जिथे अडचण होत आहे. तिथे सोडवण्यासाठी ते अग्रेसर राहिलेले आहेत अशी एक ना अनेक उदाहरणे देता येतील नगर शहराच्या प्रत्येक भागांमध्ये त्यांच्या दांडगा संपर्क आहे त्यामुळे त्यांनी आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आयोजित विधानसभेची निवडणूक लढवावी असे अनेकांचे मत आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा या बैठकीमध्ये सविस्तर अशी चर्चा पदाधिकाऱ्यांमध्ये झाली पदाधिकाऱ्यांनी आम्ही बोराटे यांच्या पाठीशी ठामपणे आहोत व राहणार आहोत पण यंदा मागचा सर्व अनुभव पाहता त्यांना सुद्धा पक्षाने उमेदवारी द्यावी अशी सुद्धा अनेकांनी भूमिका मांडलेली आहे पण दुसरीकडे यांनी निवडणूक लढवताना विधानसभा हेच ध्येय समोर ठेवावे अशावर सर्वांचे एकमत झालेले आहे