तपोवन रोड येथील बालघर प्रकल्पातील मुलांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने अन्नदान
सामाजिक कार्यातून गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होते – तनवीर मणियार
नगर : आपण समाजामध्ये वावरत असताना समाजाचे काहीतरी देणे लागते या भावनेतून सकारात्मक दृष्टिकोन सामाजिक बांधिलकी जोपासत आपले कर्तव्य पार पाडत असतो या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम राबवले जात असतात तपोवन रोडवरील बालघर प्रकल्प खऱ्या अर्थाने गरजू विद्यार्थ्यांची सेवा करत त्यांचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम केले जात आहे, अनाथ उपेक्षित वंचित बालकांना अन्नदान करण्याचे सामाजिक काम निरपेक्ष भावनेने करत असून येथील बालकांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य पाहून मला मनाला समाधान वाटते असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिव तनवीर मणियार यांनी सांगितले,
तपोवन रोड येथील बालघर प्रकल्पातील मुलांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने अन्नदान करण्यात आले, यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिव तनवीर मणियार, इंजि. केतन क्षीरसागर, अस्लम सय्यद, दीपक वाघ, अकबर शेख, संजय बोठे, रमेश गायके, रमेश शेख, अरिष सैय्यद, आयान शेख आदी उपस्थित होते.
इंजि. केतन क्षीरसागर म्हणाले की, प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासत गरजुंना मदत करावी, जेणेकरून सामाजिक कार्यास असे ते म्हणाले.