खा. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून अमोल पॅराडाईज व आरोळे कॉम्प्लेक्स परिसरातील रस्ता कॉंक्रिटीकरण व डांबरीकरण कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न
खा. सुजय विखे यांच्या माध्यमातून शहरात विकासाची मुहूर्तमेढ रोवली – मा. महापौर बाबासाहेब वाकळे
नगर : शहरामध्ये विकासाच्या योजना यशस्वीपणे राबवल्या जात असून शहर विकासाला गती प्राप्त झाली आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून विकासाची मुहूर्तमेढ रोवली असून विविध योजनांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी प्राप्त होत आहे टप्प्याटप्प्याने विविध योजनाही पूर्ण होत असल्यामुळे शहर सौंदर्यकरणात भर पडत आहे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी शहराच्या वाहतुकीच्या नियोजनासाठी ३ उड्डाणपुलासाठी निधी मंजूर करून आणला आहे याचबरोबर नगरकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न उड्डाणपुलाच्या माध्यमातून पूर्णही केले आहे तसेच शहराच्या विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून लिंक रोडची निर्मिती केली आहे, शहरातील अनेक वर्षाचे प्रलंबित रस्त्याचे प्रश्न मार्गी लावली जात आहे कायमस्वरूपी व नियोजनबद्ध विकास कामांमुळे अहमदनगर शहराची महानगराकडे वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.
सावेडी परिसरातील अमोल पॅराडाईज व आरोळे कॉम्प्लेक्स परिसरातील रस्ता कॉंक्रिटीकरण व डांबरीकरण कामाचा लोकार्पण सोहळा मा. महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी माजी नगरसेवक रवींद्र बारस्कर, माजी नगरसेविका वंदना ताठे, विलास ताठे, उदय कराळे, नितीन शेलार, भाजपच्या महिला शहर जिल्हाध्यक्षा प्रिया जानवे, किशोर वाकळे, बाळासाहेब वाकळे, कालिंदी केसकर, संजय वैद्य, अरविंद मुथा, बापूसाहेब येवले, डॉ.अविनाश वारे, संजय ओक, संभाजी कराळे, स्वप्निल छाजेड, अक्षय वैद्य, देवेंद्र डावरे, गीता गिल्डा, रेणुका करंदीकर, श्वेता पंधाडे, पप्पू गर्जे, उमेश साठे, नरेश चव्हाण, दामू बठेजा, अनिल निकम, गोपाळ वर्मा, पुष्कर कुलकर्णी, राजू मंगलाराम, सुजित खरमाळे, अशोक वाकळे, अमित गटणे, संतोष साबळे, वंदना पंडित, करण कराळे, मयूर बोचुघोळ आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देवेंद्र डावरे म्हणाले की, सावेडी गाव परिसराच्या विकासाला गती प्राप्त झाली आहे. अमोल पॅराडाईज व आरोळे कॉम्प्लेक्स परिसर हा नव्याने विकसित होणारा भाग असून अनेक दिवसांचा रस्त्याचा प्रश्न मा. महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या माध्यमातून मार्गी लागला आहे, त्यामुळे या परिसराला सुशोभीकरणाचे रूप प्राप्त झाले आहे. तसेच आम्ही सर्व रहिवासी समाधानी असून आमचे टप्प्याटप्प्याने सर्वच प्रश्न मार्गी लावली जात आहे असे ते म्हणाले.
यावेळी माजी नगरसेवक रवींद्र बारस्कर यांनी सर्वांचे आभार मानले.