Nilesh lanke | आमदार निलेश लंके यांचा लवकरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश.!
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून लढवणार निवडणूक
नगर लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असून पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके (nilesh lanke ) यांनी जोरदार तयारी सुरू केले आहे. गेल्या वर्षभरापासून नगर दक्षिण मतदार संघामध्ये व्यक्तिगत गाठीभेटीवर भर दिला आहे.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून आधी अजित पवार यांच्या गटात गेलेले पारनेरचे आमदार निलेश लंके शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत असे समजते अमोल कोल्हे यांच्या साथीने शंभूराजे नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी आपलं शक्ती प्रदर्शन चालवले लवकरच त्यांचा शरद पवार (sharad pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षात स्वतः शरद पवार यांच्याच उपस्थितीत जाहीर प्रवेश होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
आधी शरद पवार यांना देव मानत त्यांच्या नावाने कोविड सेंटर उभारून मध्येच अजित दादा फुटी नंतर अजित दादांच्या धावत्या गाडीत उडी मारणारे निलेश लंके पुन्हा लोकसभेचा अंदाज घेऊन ऐनवेळी शरद पवारांची तुतारी वाजवणार हे निश्चित झाले आहे असे कळते.
छत्रपती शंभुराजे महानाट्याला हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवला असून हे महानाट्य निलेश लंके प्रतिष्ठान च्या माध्यमातून दाखवून कुठेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख नसून पक्ष चिन्ह देखील कुठेही वापरले नाही म्हणजेच याचा अर्थ असा आहे भाजप आणि अजित दादांचे राष्ट्रवादी एकत्र लढल्यास नगर दक्षिण ची जागा ही भाजपला जाईल हे निश्चित असून त्यामुळेच मोके पे चौका साधत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून ही जागा लढवण्यासाठी निलेश लंके इच्छुक असल्याचे समजते. आमदार निलेश लंके कधी शरद पवारांच्या गटात जाणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहेत.