Facebook आणि Instagram डाऊन; फेसबुक अपोआप लॉगआऊट…
नवी दिल्ली : मेटाकडून दिल्या जाणाऱ्या अनेक सेवा डाऊन झाल्या आहेत. यामुळे फेसबुक आणि इंस्टाग्रामची सेवा बंद झाल्याच्या तक्रारी भारतासह जगभरातून येत आहेत. अनेकांचे फेसबुक अकाउंट अपोआप लॉग आउट झाले आहे. तर इंस्टाग्रामचे अनेक फिचर्स काम करत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
Downdetectorने दिलेल्या माहितीनुसार मेटाकडून दिल्या जाणाऱ्या सेवा भारतीय वेळेनुसार ९ वाजून १० मिनिटापासून डाऊन आहेत. मोबाईल अॅपसह वेब सर्व्हिस देखील काम करत नाही. फेसबुकचे अॅप देखील डाऊन आहे.
इंस्टाग्रामवरील सर्च, कमेंट सेक्शन काम करत नसल्याचे काही युझर्सनी म्हटले आहे. फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगातील फेसबुक आणि इंस्टाग्रामची सेवा डाऊन झाली आहे. याबाबत मेटाकडून अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही.
याआधी कॅब्रिज अनॅलिटिका फेसबुक डेटा लीकच्या दरम्यान फेसबुक युझर्सचे अकाउंट स्वत:हून लॉग आउट झाले होते. नंतर ही गोष्ट समोर आली की कोट्यवधी लोकांचा फेसबुक डेटा लीक झाला आहे. आता नेमका काय प्रॉब्लेम झाला आहे हे स्पष्ट झालेले नाही.