Close Menu
    What's Hot

    Nilesh lanke : जिल्हा बँकेच्या प्रत्येक शाखेत एटीएम व सोनेतारण सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न : खा.लंके

    November 16, 2026

    नगर ब्रेकिंग : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवडीनंतर सुजय विखेंची सत्यजित तांबेंनी घेतली भे

    November 15, 2026

    Akshay kardile : निळवंडेच्या उजव्या कालव्याला उद्या सहा वाजता पाणी सुटणार; आमदार अक्षय कर्डिलेंच्या पाठपुराव्याला यश

    November 14, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Breaking»‘शरद पवार म्हणतात, लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर…’ भर सभेत पवारांनी कोणाला दिला इशारा?
    Breaking

    ‘शरद पवार म्हणतात, लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर…’ भर सभेत पवारांनी कोणाला दिला इशारा?

    newstoday24By newstoday24March 7, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    ‘शरद पवार म्हणतात, लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर…’ भर सभेत पवारांनी कोणाला दिला इशारा?

    आज लोणावळ्यामध्ये शरद पवार गटांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्याला स्वत: शरद पवार उपस्थित होते. त्यांनी जाहीर सभेत एका आमदाराला इशारा सुद्धा दिला.

    शरद पवार यांनी या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक टीका सुद्धा केली. “आज हे सांगतात, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढवतो. गेली दहा वर्षे मोदी सत्तेत आहेत, उत्पन्न वाढलं का? उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आणली, हीच मोदींनी गॅरंटी दिली” अशी टीका त्यांनी केली.

    “आदर्श सोसायटी घोटाळ्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा हात आहे, असा आरोप भाजपने केला. सातव्या दिवशी ते भाजपमध्ये गेले आणि पंधराव्या दिवशी ते भाजपचे खासदार झाले. राष्ट्रवादी काँग्रेसला भ्रष्टवादी पक्ष म्हणाले. भाजप म्हणजे वॉशिंग मशीन झालेली आहे. आरोप करा आणि त्यांना पक्ष प्रवेश देऊन आरोप धुवून काढा” अशा शब्दात त्यांनी भाजपावर टीका केली. त्यांनी अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके यांना भर सभेत इशारा दिला. “मला असं समजलं की, तुम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथं येतायत म्हणून धमकी दिली. मी त्यांना सांगू इच्छितो. सुनील शेळके तू आमदार कोणामुळं झाला? तुझ्या सभेला कोण आलं होतं?”

    “पक्षाचा अध्यक्ष कोण होतं? तुझ्या त्या अर्जावर माझी सही आहे. हे लक्षात ठेवं. यापुढं असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात, हे विसरू नका. मी त्या वाटेने जात नाही, पण गेलो तर मी कोणाला सोडत नाही” असा थेट इशाराचा पवारांनी दिला.

    #Breaking #Update #Ncp #Mns
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleपाकिस्तानमधून खासदार नवनीत राणा यांना धमकी, व्हॉटसअ‍ॅपवर पाठवली क्लिप
    Next Article Next Post
    newstoday24
    • Website
    • Tumblr

    Related Posts

    नगर ब्रेकिंग : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवडीनंतर सुजय विखेंची सत्यजित तांबेंनी घेतली भे

    November 15, 2026

    Akshay kardile : निळवंडेच्या उजव्या कालव्याला उद्या सहा वाजता पाणी सुटणार; आमदार अक्षय कर्डिलेंच्या पाठपुराव्याला यश

    November 14, 2026

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.