Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Breaking»
    Breaking

    newstoday24By newstoday24March 9, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भाजप नेत्याचं आधी अपहरण, नंतर निर्घृणपणे संपवलं, धक्कादायक घटना

    रायपूर : छत्तीसगढच्या बिजापूर येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. बिजापूर येथे पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी अतिशय घृणास्पद कृत्य केलं आहे. नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा एका भाजप नेत्याची हत्या केली आहे. भाजप नेते कैलाश नाग यांची नक्षलवाद्यांनी निर्घृणपणे हत्या केली आहे. कैलाश नाग हे भाजप व्यापारी सेलचे मंडळ उपाध्यक्ष होते. नक्षलवाद्यांनी त्यांचं आधी अपहरण केलं. त्यानंतर त्यांनी कैलाश नाग यांची कुऱ्हाडीने हत्या केली. या घटनेनंतर छत्तीसगडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटना ही जांगला पोलीस ठाणे हद्दीत घडली.जांगला पोलीस ठाण्यापासून केवळ 12 किमी अंतरावर कोटामेट्टा परिसरात संबंधित घटना घडली आहे

    . या परिसरात वन विभागाकडून तलाव बनवण्याचं काम सुरु आहे. काम सुरु असतानाच बुधवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास या ठिकाणी काही नक्षलवादी आले. नक्षलवाद्यांनी सर्वात आधी तलाव बनवण्यासाठी काम करत असलेल्या जेसीबीला आग लावून जाळून टाकलं. त्यानंतर जेसीबीचे मालक कैलाश नाग यांचं अपहरण केलं.

    नक्षलवादी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी कैलाश नाग यांचं अपहरण केल्यानंतर त्यांच्यावर कुऱ्हाडीचे वार करत त्यांचा खून केला. त्यांनी हत्या करुन मृतदेह फेकून दिला. त्यानंतर नक्षलवादी तिथून पळून गेले. कैलाश नाग यांचं वय जवळपास 40 वर्ष इतकं होतं. ते ठेकेदारीचं काम करायचे. ते भाजप पक्षाचे नेतेदेखील होते. त्यांची हत्या करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्येदेखील भीतीचं वातावरण आहे. पोलीस या प्रकरणी आरोपींचा शोध घेत आहेत. हत्या झालेल्या परिसरात पोलिसांची गस्ती वाढवण्यात आली आहे.छत्तीसगडमध्ये एका वर्षात 9 भाजप नेते आणि कार्यकर्त्यांची हत्या
    मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमध्ये गेल्या वर्षभरापासून भाजपच्या 9 नेते आणि कार्यकर्त्यांची हत्या केली आहे. यावर्षी भाजपच्या दोन नेत्यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेवर भाजप नेत्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. भाजप नेत्यांनी आरोपी नक्षलवाद्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

    #Breaking #crime #Bjp #police
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleदादाला दाखवली पाठ; सुप्रिया सुळेंनी नणंदेची घेतली मात्र गळाभेट!
    Next Article तब्बल 150 तोळं सोन्याची चोरी करून गोव्याला गेली फिरायला; अखेर अभिनेत्री अटकेत
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.