दादाला दाखवली पाठ; सुप्रिया सुळेंनी नणंदेची घेतली मात्र गळाभेट!
पुणे : महाविकास आघाडी की महायुती या प्रश्नावर पवार कुटुंबातील दोन दिग्गजांनी त्यांचा वेगळा मार्ग निवडला आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर उभ्या महाराष्ट्राने पक्षातील ही फुट अनुभवली आहे. दोन्ही गोटातून दारुगोळा बाहेर पडत आहे. विखारी प्रचार तंत्र न वापरता मतदारांना भावनिक साद घातली जात आहे. लोकसभेच्या रणधुमाळीत पवार विरुद्ध पवार असा रंजक सामना होणार आहे. अजित पवार आणि शरद पवार या काका-पुतण्यांमधील दुराव्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातील लढत चिरशीची होईल, यात शंका नाही. पण त्यापूर्वीच बारामतीतील एका घटनेने राजकीय विश्लेषकांना बुचकळ्यात टाकले आहे. एकमेकांविरोधात राजकीय लढाईची तयारी सुरु असतानाच नणंद-भावजयी यांची गळाभेट झाल्याने अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत.
तर बारामती मतदार संघात पवार विरुद्ध पवार सामना रंगणार हे निश्चित झाले आहे. शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे सध्या या मतदारसंघाच्या खासदार आहेत. तर सध्या महायुतीत सहभागी झालेले अजितदादा यांची पत्नी सुनेत्रा पवार या मतदारसंघातून नशीब आजमावणार आहे. त्यामुळे सुळे विरुद्ध पवार असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत. पण त्यापूर्वीच बारामतीत नाट्यमय घटना घडली. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची एका मंदिरात गळाभेट झाली.
बारामतीजवळ जळोची गावात कालेश्वरी मंदिर आहे. या ठिकाणी हे सूखद चित्र उभ्या देशाने पाहिले. नणंद आणि भावजयी यांची गळाभेट झाली. या दोघी मंदिरात आल्या. त्यांची नजरानजर होताच, त्यांनी एकमेकींना शुभेच्छा दिल्या. गळाभेट घेतली. त्यावेळी उपस्थितांना पण हायसे वाटले. इतक्या दिवसातील पक्षातील आणि राजकारणातील भूमिकेमुळे दुरावा आलेला असताना नात्याचा दोर अजूनही घट्ट असल्याचे समोर आले. दोघांनी गळाभेट घेतली. महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
उद्या पुण्यात एका कार्यक्रमात अजित पवार, सुप्रिया सुळे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. पुणे महानगरपालिकेच्या मल्टिसपेशालीटी हिलिंग हॉस्पिटलच उद्घाटन कार्यक्रमाला दोघे उपस्थित असतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पण कार्यक्रमाला हजेरी असेल. याठिकाणी ३८० कोटीचं हॉस्पिटल उभं राहत आहे.शरद पवार गटाचे नगरसेवक सचिन दोडके यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता.