Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»खासदारकीच्या निवडणुकीत निलेश लंके टिकणार नाही. – अजित पवार
    Ahmednagar

    खासदारकीच्या निवडणुकीत निलेश लंके टिकणार नाही. – अजित पवार

    newstoday24By newstoday24March 14, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    खासदारकीच्या निवडणुकीत निलेश लंके टिकणार नाही. – अजित पवार

    पारनेरचे आमदार निलेश लंके हे आज शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार आहेत. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना निलेश लंके यांच्याबाबत आपली भूमिका मांडली आहे. यावेळी अजित पवार म्हणाले की, “वास्तविक निलेश लंकेला पक्षात मी आणलं त्याला मनापासून आधार मी दिला. आताही विकास कामांसाठी निलेशला मोठ्या प्रमाणावर मदत मी केलेली आहे, निलेश माझ्याकडे आला होता. मी निलेशसोबत चर्चा केली. त्याला काही गोष्टी समजून सांगितल्या. पण काही लोकांनी त्याच्या मनात हवा घातली आहे की, तू खासदार होशील म्हणून पण वास्तव तसं नाहीये. निलेश पारनेरपुरता लोकप्रिय आहे. पण बाकीच्या मतदारसंघात त्याला वाटतं तितकं सोपं नाही. मी त्याला सांगितलं होतं, तू तशा पद्धतीने वागू नको. जितकं समजून सांगणं गरजेचं आहे. तितकं मी केलेलं आहे. आता त्याचा निर्णय” असल्याचे अजित पवार म्हणालेत.

    या संदर्भात मी निलेश लंके यांच्याशी बोललो आहे, तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही त्यांची चर्चा करून दिलेली आहे. निवडणुकीनंतर आपण पुन्हा एकदा बसू. त्याचबरोबर संबंधित मंत्र्यांनाही एकत्र बोलवू आणि जे समज गैरसमज आहेत, ते दूर करू अशा स्वरूपाची माहिती दिली होती. मात्र त्यानंतरही अशा प्रकारची चर्चा चॅनल मधून होताना दिसत आहे. त्यामुळे जेवढे समजून सांगायचे तेवढे सांगितले. खरंतर निलेश हा चांगला आमदार आहे. त्याची लोकप्रियता पारनेर तालुक्यात आहे, मात्र पारनेर तालुक्याच्या बाहेर त्याची फारशी लोकप्रियता नाही. त्यामुळे खासदारकीच्या निवडणुकीत तो टिकणार नाही अशी त्याला माहिती दिली होती, मात्र तरी देखील त्याचा निर्णय असेल, तर त्याबाबत आपण काय बोलणार? अर्थात आमदार अपात्रतेचा निकष लक्षात घेता, त्याला अगोदर आमदार पदाचा राजीनामा द्यावा लागेल. मात्र मला समोरच्या महाविकास आघाडीतील नेत्यांच्या आश्चर्य वाटते अगोदर त्यांनी कोणालाही घेणार नाही असे सांगितले आणि नंतर मात्र त्यांनी आता निलेश, निलेश करायला सुरुवात केली आहे, हे चुकीचे आहे असे अजित पवार म्हणाले.

    #Ahmednagar #Breaking #Update
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleब्रेकिंग न्युज : अखेर अहमदनगर जिल्ह्याचे नामकरणावर अहिल्यादेवीनगर नावाचा शिक्कामोर्तब
    Next Article बोल्हेगाव रेणुका नगर येथील सप्तशृंगी माता देवी मंदिर परिसरातील काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.