बोल्हेगाव रेणुका नगर येथील सप्तशृंगी माता देवी मंदिर परिसरातील काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न
तंत्रज्ञानाच्या युगात तरुण पिढीला अध्यात्मिक व धार्मिकतेची गोडी लागणे गरजेचे – कुमारसिंह वाकळे
नगर : नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामे मार्गी लागली जात आहे, याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये तरुण पिढीमध्ये अध्यात्मिक व धार्मिकतेची गोडी निर्माण व्हावी यासाठी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होणे गरजेचे आहे, सामाजिक कार्यकर्ते अमोल लगड हे जनतेचे प्रश्न हाती घेऊन सोडवण्याचे काम करत असतात रेणुका नगर मधील सप्तशृंगी माता मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे, तरी वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम साजरे होत असतात त्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येथे येत असून या भाविकांना सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी परिसरातील काँक्रिटीकरणचे काम मार्गी लागणार आहे असे प्रतिपादन स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी केले
खा.डॉ. सुजय विखे यांच्या निधीतून सामाजिक कार्यकर्ते अमोल लगड यांच्या पाठपुराव्यातून बोल्हेगाव परिसरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये रेणुका नगर येथील सप्तशृंगी माता देवी मंदिर परिसरातील काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या हस्ते संपन्न झाला, यावेळी नगरसेवक निखिल वारे, सामाजिक कार्यकर्ते अमोल लगड, शिवतेज लाटे, संभाजी नवथर, हर्षल ढोले, सुभाष कुसळकर, श्रीराम कचरे ,किरण जाधव, कृष्णा यादव, महेश येणारे, कैलास ठाणगे, शिवाजीराव गुंजाळ, विद्या लाटे, सोनाली कुसळकर, सुनिता पाटील, संतोष वैद्य, विजय ढगे, वैभव मोकाशे, भाऊसाहेब सूर्यवंशी यांसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..
सामाजिक कार्यकर्ते अमोल लगड म्हणाले की, बोल्हेगाव नागापूर परिसर हा झपाट्याने नागरी वसाहत वाढत आहे, त्यांना सुख सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, कुमारसिंह वाकळे यांनी प्रभागाच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला असल्यामुळे विविध भागात विकासाची कामे मार्गी लागत आहे तसेच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून येथील सप्तशृंगी माता देवी मंदिर परिसरातील कॉंक्रिटीकरण कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे तसेच या परिसरातील रस्त्यांच्या कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी दिला असल्यामुळे लवकरच ती देखील कामे मार्गी लागणार आहे असे ते म्हणाले.