बेकायदेशीररित्या डिपॉझिटची रक्कम व मेडिकल इक्विपमेंट डांबून ठेवल्याबाबत गणेश फसले यांचे आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटल समोर ठिय्या आंदोलन.
पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे कारवाईची मागणी.
अहमदनगर : आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटल अहमदनगर दि. 24 जून 2020 रोजी दुय्यम निबंधक वर्ग 2 अहमदनगर यांचे समोर डॉ. अनिल आठरे, डॉ. अंजली आठरे यांच्या मालकीचे असणारी जागा ही पाच वर्ष कालावधीसाठी भाडे करारनाम्यावर घेतली होती सदर करारनाम्यापोटी रुपये एक कोटी बिनव्याजी परतावा या अटी वरती डिपॉझिट म्हणून बँक ट्रान्सफरद्वारे जागामालक यांना देण्यात आलेली आहे व दरमहा रक्कम रुपये एक लाख भाडे व तिसऱ्या व चौथ्या वर्षी दहा टक्के वार्षिक भाडेवाढ याप्रमाणे करारनामा ठरले होते त्याचप्रमाणे डॉ. अनिल व डॉ. अंजली आठरे हे आम्हाला कन्सल्टिंग देणार असे त्यांनी नोटरी द्वारे आमच्याकडून कागद तयार केला होता, सदर भाडे करारनामा सोडून आम्ही त्यांच्या कन्सल्टिंग 2022 पर्यंत घेत राहिलो परंतु त्यानंतर आम्हाला तुमची कन्सल्टिंग परवडत नाही व तुम्ही आमच्यावर बळजबरी करत आहात की जर या ठिकाणी भाडे करारनामा सुरू ठेवायचा असेल तर आमची कन्सल्टिंग द्यावीच लागेल सदर गोष्ट आम्हाला मान्य नसले कारणामुळे आम्ही सदर जागा खाली करणे बाबत डॉ. अनिल आठरे यांना नोटीस द्वारे कळवले होते सदर नोटीस त्यांना मिळाल्यानंतरही त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचे उत्तर न देता आम्हाला सदर जागेतून हाकलवून दिलेले आहे व माझे डिपॉझिटचे पैसे व जे काही मेडिकल इक्विपमेंट आहेत ते दाबून ठेवलेले आहेत सदर डिपॉझिट व वस्तूंसाठी मी वेळोवेळी न्याय मागितलेला आहे मी 10 ऑक्टोबर 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना ई-मेल तक्रारीद्वारे तक्रार दाखल केलेली आहे तदनंतर त्या तक्रारीवर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाहीये व त्यास अनुसरून मी पुन्हा 8 फेब्रुवारी 2023 रोजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालयातही तक्रार अर्ज दाखल केलेला आहे व त्याच अर्जाची आणखी एक प्रत पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना 14 फेब्रुवारी 2023 रोजी दाखल करण्यात आलेली होती माझ्या या कुठल्याही तक्रारीवर कुठल्याच प्रकारचा न्यायिक विचार झालेला नाही. माझा भारतीय न्यायव्यवस्थेवर खूप विश्वास आहे मी पुन्हा दिनांक 9 नोव्हेंबर 2023 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पुन्हा एक अर्ज दाखल केलेला आहे त्याही अर्जाची दाखल घेतली नाही म्हणून दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी अर्ज शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी नव्याने अर्ज केलेला आहे मला आपल्या भारतीय न्यायव्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे सदर प्रकरणावरती वेळोवेळी मला सांगण्यात येते की हा दिवाणी खटला आहे परंतु सदर जागेतून मला हाकलून देऊन कुठल्याही प्रकारचे पुरावे नसताना माझी जाणीवपूर्वक प्रशासन व डॉ. अनिल आठरे हे त्यांचं राजकीय वर्चस्व वापरून प्रशासनावरती दबाव आणून माझे पैसे व माझ्या वस्तू गिळंकृत करून पाहत आहेत तरी सदर अर्जाचा मेहरबान साहेबांनी विचार करावा मी आज दिनांक 15 मार्च 2024 पासून माझे भाडे तत्त्वावर घेतलेल्या जागेवरती मला व्यावसायिक स्वरूपासाठी सुद्धा सदर मिळकतीत पाय ठेवू न दिल्यामुळे सदर जागेवरती ठिय्या आंदोलन करण्याचे ठरविले आहे माझ्यावर वेळोवेळी अन्याय झालेला आहे दरवेळी डॉ. अनिल आठरे हे त्यांचे राजकीय व प्रशासकीय संबंध वापरून मला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहे मला व माझ्या कुटुंबाला त्यांनी त्यांच्याकडे असलेली लायसन्सच्या बंदूक द्वारे जीवे मारण्याची तीन वेळा धमकी दिलेली आहे, तू माझ्या प्रायव्हेट प्रॉपर्टी मध्ये आलेला आहे व या ठिकाणी मी तुला गोळी मारून गाडून टाकलं तरी कोणाला काहीही समजणार नाही या प्रकारे मला धमकी देत आहे सदर जागेवर मी ठिय्या आंदोलन करावयास आल्यानंतर या ठिकाणी बाउन्सर व रस्ता बंद करणे या प्रकारे माझ्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न ही धनिक लोक करीत आहेत तरी मी प्रशासनाला विनंती करेल ही माझ्या जीवितास कुठल्याही प्रकारची हानी झाल्यास सदर प्रकरणात डॉ. अनिल आठरे व डॉ. अंजली आठरे यांना दोषी धरण्यात यावे माझ्या जीवास या दोन लोकांकडून धोका आहे माझ्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा ही नम्र विनंती मी माझे ठिय्या आंदोलन आजपासून मला न्याय मिळेपर्यंत सुरू ठेवणार आहे सदर जागेवरती थर्ड पार्टी वस्तू असतानाही त्याही लोकांना जाणीवपूर्वक त्रास डॉ. अनिल आठवे व डॉ. अंजली आठरे हे दोघेही संगणमताने देत आहे. मेडी स्कॅन कंपनीचे सिटीस्कॅन मशीन व एक्स-रे मशीन जाणीवपूर्वक दाबून ठेवले आहे सदर मशीनची किंमत रक्कम रुपये 36 लाख रुपये असून हेही पैसे गिळंकृत करावयाचे आहे तसेच संजीवनी गॅस एजन्सीचे ऑक्सिजन सिलेंडर व द्युरा सिलेंडर डॉ. अनिल आठरे व डॉ. अंजली आठरे यांनी दाबून ठेवलेले आहे तरी संबंधितांवर कारवाई करून मला न्याय द्यावा अशी मागणी पोलीस अधीक्षक यांच्याकडे गणेश फसले यांनी निवेदनाद्वारे केली, अधिक माहितीसाठी संपर्क : मोबाईल नंबर 8669631414