केडगाव ओंकार नगर येथील हनुमान मंदिर सुशोभीकरण कामाचा शुभारंभ संपन्न.
केडगावचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणार – सचिन कोतकर
नगर : केडगाव उपनगराच्या विकासाचे स्वप्न गेल्या दहा वर्षापूर्वी मा.महापौर संदीप दादा कोतकर यांनी पाहिले होते. त्यांचा प्रतिनिधी म्हणून ते कामपूर्ण करणार आहे. केडगावच्या विकास कामासाठी खा.डॉ. सुजय विखे पाटील व आ. संग्राम जगताप यांचे सहकार्य लाभत आहे. विकासाचे कामाचे नियोजन केले असून टप्प्याटप्प्याने सर्वच कामे मार्गी लावणार आहे. केडगावकरांना एकत्रित करून विकसित उपनगर निर्माण करणार आहे. ओंकार नगर मधील हनुमान मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी भावीवर्ग मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात. त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे. या कामासाठी भूषण गुंड यांनी पाठपुरावा केला आहे. मंदिरांच्या माध्यमातून समाजामध्ये अध्यात्मिकतेची गोडी निर्माण होईल आजच्या युवा पिढीला धार्मिकतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी वर्षभर कार्यक्रमाचे आयोजन होणे गरजेचे आहे. लवकरच केडगाव मधील 55 रस्त्यांची कामे सुरू होणार असल्याचे प्रतिपादन उद्योजक सचिन कोतकर यांनी केले.
केडगाव ओंकार नगर येथे खा.डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून हनुमान मंदिर सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन सोहळा उद्योजक सचिन कोतकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मा. सभापती मनोज कोतकर, भूषण गुंड, जालिंदर कोतकर, बलभीम कर्डिले, पवन काळे, जयद्रथ खाकाळ, सुनील उमाप ,अशोक कराळे, मयूर जगदाळे, राजू पवार ,गणेश धांडे, आबा काळे ,अनिल ठुबे, राजू ढुमणे ,दत्तात्रय पावडे, बाळासाहेब ढाकणे, विजय कोतकर, मयूर जगदाळे, आदी उपस्थित होते.
भूषण गुंड म्हणाले की केडगाव मध्ये भानुदास कोतकर व मा.महापौर संदीप कोतकर यांनी खऱ्या अर्थाने विकास कामांची मुहूर्तमेढ रोवली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योजक सचिन कोतकर यांच्या माध्यमातून केडगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामे सुरू आहेत त्यामुळे चांगले काम उभे राहत आहे. समाजामध्ये विकासाच्या कामाबरोबरच धार्मिकतेचे ही महत्त्व असून केडगाव परिसरातील मंदिरांसमोर सभा मंडपाचे कामे उभे राहत आहे असे ते म्हणाले.