प्र. क्र.चार मध्ये मा. नगरसेविका उषाताई नलवडे यांच्या पाठपुराव्यातून व खा.डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून मॉर्डन कॉलनी येथे बंद पाईप गटार कामाचा शुभारंभ संपन्न.
डॉ. सुजय विखे पाटील हे विकासाचे व्हिजन असणारे खासदार आहेत – उषाताई नलवडे
नगर : लोकसभेत खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील विकासाचे प्रश्न मांडले असल्यामुळेच मोठा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळेच नगर शहरांमध्ये विकासाचे मोठे प्रकल्प उभारले जात आहे. मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामे हाती घेतली असल्यामुळेच मॉर्डन कॉलनीतील अनेक वर्षाचा पावसाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. या ठिकाणी पावसाळ्यामध्ये नागरिकांच्या घरांमध्ये अक्षरशः पाणी शिरून आर्थिक नुकसान होत असते. मात्र आता हे काम मार्गी लागणार आहे. लोक पावसाळ्याची वाट पाहत असतात मात्र या भागातील नागरिकांना पावसाळा आलाय की चिंता पडत असते नागरिकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न सुटला आहे डॉ. सुजय विखे पाटील हे विकासाचे व्हिजन असणारे खासदार आहेत असे प्रतिपादन मा.नगरसेविका उषाताई नलवडे यांनी केले.
प्रभाग क्रमांक चार मध्ये माजी नगरसेविका उषाताई नलवडे यांच्या पाठपुराव्यातून व खा.डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून मॉर्डन कॉलनी येथे बंद पाईप गटार कामाचा शुभारंभ भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या हस्ते संपन्न झाले. मा.महापौर बाबासाहेब वाकळे, मा.नगरसेविका उषाताई नलवडे, मा.नगरसेवक नितीनजी शेलार ,रामदास , आंधळे,संगीताताई खरमाळे, भारतीय जनता पार्टी महिला अध्यक्ष शहर प्रियाताई जानवे,भारतीय जनता पार्टीचे प्रदेश निमंत्रक ॲड.विवेकजी नाईक, संपतराव नलवडे, अमित गटणे
,किशोर वाकळे, पुष्कर कुलकर्णी, राहुल आंधळे, बंटी ढापसे, अनिल ढवन, विशाल नाकाडे, मनीष शेळके,श्रीधर शेळके, सुमित महाजन,सुनील टकले,अनिल टकले,बाळासाहेब देशमुख,सचिन बरशेट्टी,सुनील गायकवाड,सुरेश देशपांडे,हरिभाऊ देशपांडे ,सौ देशपांडे, दिलीप कुलकर्णी,श्री.गुंजाळ,मुकुंद शेठ,श्री मकासरे,अमोल भिसे,डॉ.यवतकर,श्री बेरड,श्री कवडे,श्रीनिवास सिद्दम. आदी उपस्थित होते.