नगर शहराचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर केल्याबद्दल शहराचे आ.संग्राम जगताप व मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांचा हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने नागरी सत्कार संपन्न.
लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यानगर शहराच्या प्रस्तावाला केंद्र सरकार मंजुरी देईल – आमदार संग्राम जगताप
नगर : शहराच्या नामांतराची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौंडी येथील कार्यक्रमात केली होती. त्यानंतर अनेक दिवस हा प्रस्ताव तसाच पडून होता आयुक्त यांनी प्रस्ताव तयार करून राज्य शासनाला पाठविला व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेत नामांतराचा विषय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत घेतला व मंत्रिमंडळाने प्रस्तावाला मंजुरी दिली. आता लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर या प्रस्तावाला केंद्र सरकार मंजुरी देईल व नगर शहराचे नाव अहिल्या नगर शहर म्हणून ओळखले जाईल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
नगर शहराचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर केल्याबद्दल शहराचे आ. संग्राम जगताप व मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांचा हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने नागरी सत्कार संपन्न झाला.
चौकट : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे नाव संपूर्ण देशाला माहित आहे. त्यांचा इतिहास खूप मोठा आहे एक महिला असून त्यांनी समाजाला दिशा व प्रेरणा दिली आहे मंदिरांच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. विकास कामाच्या माध्यमातून भविष्यकाळात विकसित अहिल्यानगर शहर म्हणून ओळखले जाणार आहे. असे मत आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.