Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»सावेडी गावठाण येथे माजी सभागृह नेते रवींद्र बारस्कर यांच्या प्रयत्नातून खंडोबा मंदिर सभा मंडप कामाचे भूमिपूजन संपन्न.
    Ahmednagar

    सावेडी गावठाण येथे माजी सभागृह नेते रवींद्र बारस्कर यांच्या प्रयत्नातून खंडोबा मंदिर सभा मंडप कामाचे भूमिपूजन संपन्न.

    newstoday24By newstoday24March 16, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सावेडी गावठाण येथे माजी सभागृह नेते रवींद्र बारस्कर यांच्या प्रयत्नातून खंडोबा मंदिर सभा मंडप कामाचे भूमिपूजन संपन्न.

    समाज प्रबोधनाचे काम केले जाईल – मा सभागृहनेते रवींद्र बारस्कर

    नगर : शहराला धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा लाभलेला असून त्याचे जतन व्हावे यासाठी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून विविध विकास कामांसाठी निधी प्राप्त झाला आहे. त्यानुसार पुरातन काळातील खंडोबा मंदिरासमोर सभा मंडप उभा राहणार आहे. हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान असून या ठिकाणी भावी वर्ग मोठ्या संख्येने देवदर्शनासाठी येत असतात. त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. धार्मिकतेच्या माध्यमातून समाज जोडला जात असून संत महंतांचे विचार पोचवण्याचे काम होत असते. सभा मंडपाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम केले जाईल. खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी दिला असून टप्प्याटप्प्याने प्रभागातील विकासाची कामे मार्गी लागत आहे. असे प्रतिपादन मा.सभागृह नेते रवींद्र तात्या बारस्कर यांनी केले.
    मा.सभागृह नेते नगरसेवक रवींद्र बारस्कर यांच्या प्रयत्नातून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खा.सुजय विखे पाटील यांच्या विकास निधीतून सावेडी गावठाण येथील खंडोबा मंदिराच्या सभामंडपाचे भूमिपूजन भाजपा शहर जिल्हाध्यक्ष ॲड अभय आगरकर यांच्या हस्ते तसेच मा. महापौर बाबासाहेब वाकळे व सर्व सावेडी ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
    यावेळी मा सभागृहनेते रवींद्र बारस्कर ,प्रदेश सदस्य किशोर वाकळे ,विवेक नाईक, नितीन शेलार, अमित गटने ,महादेव बारस्कर, विजयराव वाकळे, विठ्ठल बारस्कर, बबन बारस्कर, श्रीकांत वाकळे , ॲड महेश काळे गणेश वाकळे, सचिन बारस्कर ,अशोकराव वाकळे ,भोरू बारस्कर, डॉ बाळासाहेब भगत, संजय अडोळे, विलास वाकळे, संपत नलावडे,सदाशिव भिंगारदिवे , भगवान जगताप,भरत खाकाळ ,किशोर बारस्कर , नारायण वाकळे,सुरेश वाकळे ,बाळासाहेब वाकळे, रोहिदास बारस्कर,करण कराळे,बाळासाहेब बारस्कर ,महेश कराळे ,अभिषेक वाकळे ,देविदास बारस्कर ,कचरू बारस्कर ,भानुदास बारस्कर ,रमेश चव्हाण, दत्ता वाकळे ,अरविंद वाकळे ,प्रशांत कर्णवत ,बाबासाहेब भिंगारदिवे, संतोष दंडवते, रावसाहेब करपे, पप्पू आडोळे, प्रदीप चेमटे ,पुष्कर कुलकर्णी ,भैय्या बारस्कर ,चंदू भिंगारदिवे, भाऊ भिंगारदिवे, रोहन बारस्कर ,अक्षय बारस्कर, मयूर वाकळे ,राम बारस्कर, अवधूत बारस्कर,नारायण वाकळे इत्यादी उपस्थित होते.
    भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर म्हणाले की, सावेडी गावठाण येथील खंडोबा मंदिर हे पुरातन व ऐतिहासिक आहे या ठिकाणी भावीक वर्ग वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करत असतात. मा.सभागृह नेते रवींद्र तात्या बारस्कर यांनी मंदिरासमोर सभा मंडप उभारावा यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विकासाच्या योजना नियोजनबद्ध व कायमस्वरूपी राबवल्या जात असल्याचे ते म्हणाले.

    यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवानराव जगताप यांनी केले. आभार ॲड महेश काळे यांनी मानले.

    #Ahmednagar #Breaking #News
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleनगर शहराचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर केल्याबद्दल शहराचे आ.संग्राम जगताप व मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांचा हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने नागरी सत्कार संपन्न.
    Next Article सहकार सभागृह रोड ते महात्मा फुले चौक व व्हिडिओकॉन रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ संपन्न
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    नगर ब्रेकिंग : धडा वेगळ मुंडके,एक पाय बाजूला अनोळखी तरुणाच्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला उलगडा 

    March 16, 2025
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.