Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»सहकार सभागृह रोड ते महात्मा फुले चौक व व्हिडिओकॉन रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ संपन्न
    Ahmednagar

    सहकार सभागृह रोड ते महात्मा फुले चौक व व्हिडिओकॉन रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ संपन्न

    newstoday24By newstoday24March 16, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सहकार सभागृह रोड ते महात्मा फुले चौक व व्हिडिओकॉन रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ संपन्न

    उपनगरांसह गावठाण भागाचा देखील विकास सुरु – आ. जगताप

    नगर – वाढत्या उपनगरांसह नगर शहरातील मध्यवस्तीतही विकासकामांचा धडाका सुरू असून शहर गावठाणासह उपनगरातील भागांमध्ये राज्य सरकार, केंद्र सरकार व महानगरपालिकेच्या माध्यमातून मूलभूत सोयी सुविधांसह विकासाचे कामे मार्गी लागत असल्याने नगरकर समाधानी आहे. येणाऱ्या काळात उपनगरांसह गावठाणाचाही भाग विकसित करून शहर स्वच्छ, सुंदर व हरित म्हणून राज्यासह देशभरात नावलौकिकास येईल. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नगर शहरातील मूलभूत सुविधांसाठी मोठा निधी प्राप्त झाला असून या निधीच्या माध्यमातून विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे काम केले जाईल. असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. सहकार सभागृह रोड ते महात्मा फुले चौक व व्हिडिओकॉन रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, जेष्ठ विधीज्ञ शरद पल्लोड, विपुल शेटीया, बाबुशेठ लोढा, चंद्रकांत ओव्हळ, शंकर रासकर, लकी खूबचंदानी, ॲड. राहुल रासकर, अशोक कोठारी, लक्ष्मीकांत जाजू, विजय बोरा, बापूसाहेब ओव्हळ, अरुणराव रासकर, मनोज मालकर, रमेशचंद्र छाजेड, नंदू पोपटाणी, रामनारायण मंत्री, नानासाहेब पांडुळे, सुभाष ओस्तवाल, राजेश झंवर, सचिन भंडारी, अभय लोढा, वसंतलाल कटारिया, अजय फिरोदिया, मनोहर खूबचंदानी, पवळ काका आदींसह मान्यवर उपस्थित होते.
    यावेळी पुढे बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की, नगर शहरालगत मोठ्या प्रमाणावर उपनगरे तयार झाले असून या उपनगरांच्या विकासासोबतच गावठाण भागाचा देखील विकास कुठे न थांबवता अविरतपणे सुरूच आहे. शहरातील मुख्य धार्मिक स्थळांना जोडणारे रस्ते विकसित करून येणाऱ्या भाविकांना सुलभ पद्धतीने प्रार्थनेसाठी जाता यावे यासाठी दर्जेदार रस्त्यांचे जाळे तयार केले. काही भागांमध्ये आपल्या नगरसेवकांच्या पाठपुराव्यामुळे देखील अनेक विकासाची कामे झाली असून त्या भागांमध्ये देखील निरंतर विकासाची कामे सुरूच राहणार आहे. आज नगर शहरासह उपनगरातील महत्त्वाच्या चौकांचे सुशोभीकरण देखील सुरू असून नगर शहरातील दोन भागांत म्युझिकल फाउंटनच्या माध्यमातून नगर शहरातील नागरिकांना करमणुकीचे एक ठिकाण तयार केले आहे. देशभरातील जैन धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले आनंदधाम परिसरात देखील काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून प्रशस्त व चांगल्या दर्जाचा रस्ता तयार करू शकलो त्यामुळेच नगर शहर बदलतय अशी भावना येथील नागरिकांची झाली आहे याचा मोठा आनंद व समाधान वाटते.
    यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, सामाजिक कार्यकर्ते ॲड. राहुल रासकर, ज्येष्ठ विधीज्ञ शरद पल्लोड यांनी आपले मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी आभार लकी खूबचंदानी यांनी मानले.

    #Ahmednagar #Breaking #Update
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleसावेडी गावठाण येथे माजी सभागृह नेते रवींद्र बारस्कर यांच्या प्रयत्नातून खंडोबा मंदिर सभा मंडप कामाचे भूमिपूजन संपन्न.
    Next Article किनगांव च्या फुले महाविद्यालयात हिंदी साहित्य और किसान विमर्श या विषयावर राष्ट्रीय चर्चासञ
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.