किनगांव च्या फुले महाविद्यालयात हिंदी साहित्य और किसान विमर्श या विषयावर राष्ट्रीय चर्चासञ
.
हिंदी विभागाच्या वतीने एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र
महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबई व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड संलग्नीत श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालय किनगाव येथे हिंदी विभागाच्या संयुक्त विद्यमाने एकदिवशीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन हिंदी साहित्य और किसान विमर्श या विषयावर सोमवार दि. १८ मार्च २०२४ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे. या राष्ट्रीय चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबईचे कार्याध्यक्ष डॉ. शीतला प्रसाद दुबे राहणार आहेत, तर या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन नाशिक च्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंहजी बिसेन यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून, प्रमुख पाहुणे श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष विठ्ठलराव (भाऊ) बोडके उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख मार्गदर्शक तथा बीजभाषक कलकत्ता येथील ज्येष्ठ सुप्रसिद्ध साहित्यिक सौ. मधू कांकरिया याचे अनमोल मार्गदर्शन लाभणार आहे.
या उद्घाटन समारंभा नंतर प्रथम सत्रात स्वा.रा.ती.म. विद्यापीठाचे हिंदी अभ्यास मंडळ सदस्य तथा हिंदी विषयाचे तज्ञ डॉ. मनोहर भंडारे (उदगीर) हिंदी कथा साहित्य और किसान विमर्श यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन लाभणार असून अध्यक्षस्थानी विशेष सत्राध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर चे हिंदी विभागाचे डॉ सुधाकर शेंडगे राहणार आहेत तर द्वितीय सत्रामध्ये किसान विमर्श के परीक्षेत्र में कविता तथा कथेत्तर गद्य या विषयावर विषय तज्ञ म्हणून रेणापूर च्या शिवाजी महाविद्यालयाचे हिंदी विभागाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी सदस्य डॉ सतीश यादव यांचे मार्गदर्शन होणार असून अध्यक्षस्थानी मुंबई विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे डॉ. हुबनाथ पांडेय (मुंबई) विशेष उपस्थित राहणार आहेत. दिवसभर चालणाऱ्या राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप समारंभ सायंकाळी ५.०० वाजता संपन्न होणार असून समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड चे हिंदी अभ्यास मंडळ अध्यक्ष तथा हिंदी विभागाध्यक्ष डॉ. सुजितसिंह परिहार (परभणी) राहणार असून प्रमुख पाहुणे कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय बाभळगाव चे हिंदी विभागाध्यक्ष्य डॉ. रणजित जाधव उपस्थित राहणार असून प्रमुख उपस्थिती श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामजी बप्पा बोडके स्वा रा ति म विद्यापीठ नांदेड चे विद्यापरिषद सदस्य तथा हिंदी अभ्यास मंडळ सदस्य , हिदी विभाग प्रमुख आयोजक प्राचार्च डॉ बबनराव बोडके , स्वा रा ति म विद्यापीठ हिंदी अभ्यास मंडळ .सदस्य डॉ संतोष येरावार देगलूरकर , श्री छञपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या सदस्या सौ. लताताई मोरे यांची उपस्थिती लाभणार आहे.
या राष्ट्रीय चर्चासत्रात लातूर जिल्ह्यतील आदर्श शेतकऱ्यांचा सत्कार होणार असून आयोजक हिंदी विभाग प्रमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बबनराव बोडके यांनी प्राध्यापक प्रतिनिधी ,शेतकरी , विद्यार्थी- विद्यार्थीनी यांनी राष्ट्रीय चर्चासत्रात सहभागी होऊन मार्गदर्शना चा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे या राष्ट्रीय चर्चासत्राची जय्यत तयारी झाली असून उपप्राचार्य डॉ विठ्ठल चव्हाण , अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा डॉ प्रभाकर स्वामी , संयोजक हिंदी विभागाचे डॉ वीरनाथ हुमनाबादे, डॉ संतोष पवार , प्रा ज्ञानेश्वर बोडके आणि संयोजन समितीचे सदस्य डॉ भारत भदाडे , प्रा बालाजी आचार्य , प्रा पांडुरंग कांबळे ,प्रा विष्णू पवार, प्रा लक्ष्मण क्षिरसागर , प्रा सदाशिव वरवटे , प्रा संजय जगताप , डॉ बळीराम पवार , डॉ अनंत सोमुसे, डॉ दर्शना कानवटे , डॉ चेतन मुंढे , प्रा अजय फड ,कार्यालयीन अधिक्षक गोपाळ इंदाळे ,उद्धवराव जाधव , श्रावण नवरखेले, उमेश जाधव, अनिल भदाडे , किशन धरणे, आखिल शेख, शिवाजी हुबाड आदि परिश्रम घेत आहेत.
News today 24 असलम शेख लातूर,