Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»मनपा महिला बालकल्याण समिती मा. सभापती पुष्पा बोरुडे यांच्या प्रयत्नातून प्रभागातील महिलांना डस्टबिन वाटपाचा शुभारंभ मा. महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते संपन्न
    Ahmednagar

    मनपा महिला बालकल्याण समिती मा. सभापती पुष्पा बोरुडे यांच्या प्रयत्नातून प्रभागातील महिलांना डस्टबिन वाटपाचा शुभारंभ मा. महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते संपन्न

    newstoday24By newstoday24March 16, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मनपा महिला बालकल्याण समिती मा. सभापती पुष्पा बोरुडे यांच्या प्रयत्नातून प्रभागातील महिलांना डस्टबिन वाटपाचा शुभारंभ मा. महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते संपन्न

    नागरिकांनी आपल्या घरापासून स्वच्छतेचे सूत्र अंगीकारावे – पुष्पा बोरुडे

    नगर : केंद्र व राज्य सरकार महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छतेवर मोठे काम केले जात असून नागरिकांमध्ये देखील स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते, प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरापासून स्वच्छतेचे सूत्र अंगीकारल्यास आपला प्रभाग, शहर, राज्य व देश स्वच्छ राहण्यास मदत होईल, त्या माध्यमातून स्वच्छ, सुंदर प्रभाग संकल्पना यशस्वी होईल व नागरिकांचे आरोग्य सदृढ, निरोगी राहण्यास मदत होईल स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये लोकचळवळ उभी राहणे गरजेचे आहे, आपला ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करूनच घंटागाडी मध्ये टाकावा, यासाठी प्रभागातील महिलांना डस्टबिनचे वाटप केले आहे, संत गाडगेबाबा यांनी समाजामध्ये स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचे काम केले आहेत, आज त्यांचे विचार प्रत्येकाने अंगीकारून शहर स्वच्छतेबाबत लढा उभा करावा असे प्रतिपादन मा. सभापती पुष्पा बोरुडे यांनी केले.
    अहमदनगर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती मा. सभापती पुष्पा बोरुडे यांच्या वतीने प्रभागातील महिलांना डस्टबिनचे वाटप माजी महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सभापती पुष्पा बोरुडे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, माजी नगरसेवक सचिन शिंदे, माजी नगरसेवक श्यामअप्पा नळकांडे आदींसह प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    माजी महापौर रोहिणी शेंडगे म्हणाल्या की, अहमदनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून नगर शहरांमध्ये स्वच्छतेचा उपक्रम यशस्वी करण्याचे काम सुरू आहे आपले शहर कचराकुंडी मुक्त झाले आहे माजी उपमहापौर अनिल बोरुडे हे नेहमीच प्रभागांमध्ये वेगवेगळ्या संकल्पना राबवत यशस्वी करत असतात, डस्टबिन वापराच्या माध्यमातून आता नागरिक रस्त्यावर कचरा न टाकता थेट घंटागाडीतच टाकतील व आपला परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत करतील अशी अपेक्षा व्यक्त करते, नागरिकांच्या सहकार्यातून नगर शहराला केंद्र व राज्य सरकारचे स्वच्छतेबाबत विविध पुरस्कार प्राप्त झाले आहे तरी पुढील काळामध्ये आपण सर्वजण मिळून आपले प्रभाग व शहर स्वच्छ सुंदर व हरित ठेवण्यासाठी काम करू बालिकाश्रम रोड परिसराचा विकास कामातून कायापालट झाला असून या परिसराला सुशोभीकरणाचे स्वरूप प्राप्त झाले आहे असे त्या म्हणाल्या.

    #Ahmednagar #Breaking #News
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleकिनगांव च्या फुले महाविद्यालयात हिंदी साहित्य और किसान विमर्श या विषयावर राष्ट्रीय चर्चासञ
    Next Article स्व.दिलीपजी गांधी यांचे नगरच्या विकासात मोलाचे योगदान – आ. निलेश लंके 
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    नगर ब्रेकिंग : धडा वेगळ मुंडके,एक पाय बाजूला अनोळखी तरुणाच्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला उलगडा 

    March 16, 2025
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.