स्व.दिलीपजी गांधी यांचे नगरच्या विकासात मोलाचे योगदान – आ. निलेश लंके
माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आ. निलेश लंके यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत अभिवादन केले आहे. सोशल नेटवर्कर आ. लंके यांनी म्हटले आहे की,
काही माणसं पक्ष, गट-तट यांच्या पलीकडची असतात. सर्व सामान्य माणूस त्यांच्याकडे जाऊ शकतो, कोणताही सामान्य व्यक्ती फोन करून रात्री बे रात्री गांधी साहेबांचा आधार घ्यायचा. कोणत्याही पक्षाचा असो दिल्लीमधील नगरकरांना हक्काचं आधार माजी खासदार स्व.दिलीपजी गांधी हे यापैकीच एक… त्यांनी नगरच्या विकासात मोलाचे योगदान दिले. पायाभूत सुविधांचा विकास करीत असताना सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून त्यांनी काम केले. शहरात आज उड्डाणपूल व नगरचा सर्व रिंग रोड बांधला गेला आहे. त्याचे जनक दिलीपजी गांधी हेच आहे. ‘असेन मी, नसेन मी, परि विकासातूनी दिसेन मी’ असे ते म्हणायचे. त्यांच्या पश्चात जेंव्हा जेंव्हा या उड्डाणपूलावरुन जाणे होते तेंव्हा तेंव्हा त्यांची आठवण येते. त्यांचे नाव निघतेच निघते. जनसामान्यांचे नेते, नगरचे सुपुत्र माजी खासदार दिलीपजी गांधी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन. तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली.